अकाेला : संसदेत कामकाज सुरू असताना गोंधळ घालणाऱ्या १४६ खासदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ कांॅग्रेसने शुक्रवारी रस्त्यावर धाव घेतली. पक्षाचे मुख्यालय असलेल्या स्वराज्य भवनसमाेर मंडप टाकाला. याठिकाणी पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी घाेषणा देत निलंबनाच्या कारवाईचा निषेध नाेंदवला.
संसदेची सुरक्षा भेदण्यात आल्याचे पडसाद अनेक ठिकाणी उमटले हाेते. त्यामुळे ३ डिसेंबर रोजी विरोधकांनी पंतप्रधान मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत झालेल्या गोंधळाबाबत लोकसभेत निवेदन देण्याची मागणी केली. या संदर्भात विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. त्यामुळे खासदारांना निलंबित करण्यात आले. यामध्ये लोकसभेतील १०० आणि राज्यसभेतील ४६ खासदारांचा समावेश हाेता.
दरम्यान या कार्यवाहीचे पडसाद अकाेल्यातही उमटले असून, २२ डिसेंबर राेजी कांॅग्रेसतर्फे निषेध नाेंदवण्यात आला. यावेळी महानगराध्यक्ष डाॅ. प्रशांत वानखडे, जिल्हाध्यक्ष अशाेक अमानकर, कपिल रावदेव, युवक कांॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष आकाश कवडे, इंटकचे प्रदीप वखारीया, प्रवक्ते कपिल ढाेके, अभिजित तवर, सागर कावरे, अंशुमन देशमुख, पराग कांबळे, विवेक पारसकर, तश्वर पटेल आदी हाेते.
भाकपचा निषेध माेर्चा
संसदेतील विविध राजकीय पक्षांच्या खासदारांचे केलेले निलंबन रद्द करण्यात यावे, यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने शुक्रवारी गांधी- जवाहर बागसमाेर आंदाेलन केले. भाकपने निषेध माेर्चा काढत घाेषणा दिल्या. आंदाेलकांनी केंद्र सरकारचा निषेध नाेंदवला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान दोन्ही सभागृहातून विक्रमी संख्येने खासदारांना निलंबित करण्यात आले. त्यामुळे भाकपतर्फे २२ डिसेंबर राेजी आंदाेलन करण्यात आले.
आंदाेलनात कॉम्रेड नयन गायकवाड, काँग्रेस व इंटकचे प्रदीप वाखरिया, आयटकचे विद्याधर ढोरे, कुरुमदास गायकवाड, ज्योती ताथोड, मायावती बोरकर, छाया वारके, प्रिया वरोटे, पदमा कांबळे , प्रिया गजभिये, वनिता हिवरे, उज्वला मेश्राम, आशा दीपके, ज्योती ताथोड, पुष्पा खैरे, रामकुवर खैरे, वनमाला गोपनारायण, आदींसह माेठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.