Akola : अवकाळी पावसाचा दुसऱ्या दिवशीही वऱ्हाडला फटका!

बुलडाणा जिल्ह्यात ३४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
Akola news
Akola newsesakal
Updated on

अकोला : पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा आणि वाशीम या तिन्ही जिल्ह्यांना सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. बुलडाणा जिल्ह्यात ३४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. शिवाय शेडनेटमध्ये होणाऱ्या संरक्षित शेतीची धुळधाण झाली. वऱ्हाडातील तीन जिल्ह्यात सुमारे १०० पेक्षा अधिक शेळ्या-मेंढ्या दगावल्या. वाशीम जिल्ह्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

Akola news
Hair Care Tips : कोरड्या आणि फ्रिझी केसांना मऊ बनवायचे आहे? मग, ‘या’ टीप्सची घ्या मदत

वऱ्हाडातील तिन्ही जिल्ह्यात रविवारी (ता.२६) रात्री पासून अवकाळी पाऊस सुरू आहे. सोमवारी रात्रीसुद्धा पावसाने झोडपून काढले. या संकटामुळे प्रामुख्याने कपाशी, तूर, कांदा, मका, भाजीपाला, फळबागा पिकांचे मोठे नुकसान झाले. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा, देऊळगावराजा, लोणार तालुक्यातील शेडनेटमधील बीजोत्पादनाचे अतोनात नुकसान झाले. मंगळवारी (ता.२८) पहाटेसुद्धा जोरदार पाऊस झाला. अवकाळीमुळे नांदुरा तालुक्यात १० हजार ६७० हेक्टरवरील कपाशी, तूर, फळपीक, संग्रामपूरमध्ये टोमॅटो, मिरचीचे २१ हेक्टरवर, लोणारमध्ये ७६०० हेक्टरवरील तुरीचे, सिंदखेडराजात ७९८५ हेक्टरवर गहू, कांदा, भाजीपाला, फळपिकांचे तर देऊळगावराजा तालुक्यातही ७६१० हेक्टरवरील फळपिके, रब्बी ज्वारी, भाजीपाल्याचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून वरिष्ठांना अहवाल देण्यात आला आहे.

Akola news
Share Market Tips: बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स असतील ऍक्शनमध्ये ?

शेडनेटचे नुकसान

बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा, लोणार, देऊळगावराजा या तालुक्यात शेडनेटमधील संरक्षित शेतीला पाऊस, गारपीट व वादळाचा फटका बसला. जीआय स्ट्रक्चरमधील ४७ शेडनेट जमिनदोस्त झाले. तर बांबू स्ट्रक्चर असलेले ९५९ शेडनेट जमिनीवर आले. यात लोणारमध्ये २४८, देऊळगावराजा २११, सिंदखेडराजा ५०० शेडनेटचा समावेश आहे. दोन्ही मिळून १००६ शेडनेट व १३२ हेक्टरवरील बीजोत्पादनाचे नुकसान झाले.

पळसखेड चक्का गारपिटीचे केंद्र

सिंदखेडराजा तालुक्यातील किनगावराजा परिसरातील पळसखेड चक्का, पिंपळगावलेंडी व इतर गावांत रविवारी (ता.२६) मध्यरात्रीनंतर जोरदार गारपीट झाली. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या वादळामुळे शेडनेटधारक शेतकरी, द्राक्ष, डाळिंब, सीताफळ, फुलशेती, भाजीपाला उत्पादक बागायतदार धास्तावले. किनगावराजा, पांगरी उगले, उमरद, जांभोरा, रुम्हणा, सोनोशी, राहेरी खुर्द, राहेरी बुद्रुक, हिवरखेड पूर्णा, विझोरा, निमगाव वायाळ, साठेगाव, पिंपळगाव लेंडी, शेलगाव राऊत, पळसखेड चक्का, सावखेड तेजन यासह असंख्य गावांना वादळीवार व अवकाळी पावसाचा फटका बसला. पळसखेड येथे मोठ्या आकाराची गारपीट झाली. यात शेडनेट तुटून पडले. सिंदखेड राजा तालुक्यांमध्ये चारही मंडलातील शेडनेट जोरदार वारा व गारांमुळे उदध्वस्त झाले आहेत. आ. डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी बांधावर जावून माळसावरगाव, उमरद ,बामखेड यासह इतर गावात नुकसान झालेल्या गांवामध्ये प्रत्यक्ष पाहणी केली.

Akola news
Health Care News: चपाती ऐवजी या दोन पिठाच्या भाकरी खाणे आरोग्यदायक! हाडे होतील मजबूत

वीज पडून वाशीम जिल्ह्यात शेतकरी दगावला

वाशीम जिल्ह्यात वीज पडून शेतकरी ठार झाला. एकूण शंभरावर मेंढ्या दगावल्या. जिल्ह्यात गारपीटीसह वादळी पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. रिसोड तालुक्यातील देऊळगाव बंडा येथील शेतकरी प्रकाशराव सरनाईक ( वय ५१) यांचा वीज पडून मृत्यू झाला. मंगरूळपीर तालुक्यातील कोठारी येथे गारपिटीने आठ मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. कारंजा तालुक्यातील शिवनगर येथे २५ , दापूरा येथे ३० तर शहा येथे ३० मेंढ्या मरण पावल्या आहेत.

Akola news
Health Care News: तुम्हीही ब्लॅक टीमध्ये लिंबू टाकून पिता का? किडनीचं होऊ शकतं मोठं नुकसान

अकोला जिल्ह्यात पंचनामे सुरू

अकोला जिल्ह्यात दोन दिवसांत अवकाळी पावसाने तूर, कापूस आणि पळबागांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषी विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे.

Akola news
Health Care News: तुम्हीही ब्लॅक टीमध्ये लिंबू टाकून पिता का? किडनीचं होऊ शकतं मोठं नुकसान

तिन्ही जिल्ह्यात पावसाचा जोर

अकोला, बुलडाणा, वाशीम या तिनही जिल्ह्यात बहुतांश मंडळांमध्ये पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली.

अकोला जिल्हा ः अकोट तालुक्यात २७, तेल्हारा २४.८, बाळापूर २३.४, पातूर २०.६, अकोला २०.४ , बार्शीटाकळी ११.९, मूर्तिजापूर १६.९

बुलडाणा जिल्हा ः जळगाव जामोद ३५.३, संग्रामपूर ३२.८, चिखली १९.६, बुलडाणा १३.९, देऊळगावराजा १९.९, मेहकर २३.७, सिंदखेडराजा २२.७, लोणार १२.७, खामगाव २४.५, शेगाव ३३.७, मलकापूर २४.७, मोताळा २०, नांदुरा १४.२

वाशीम जिल्हा ः वाशीममध्ये ३४.८, रिसोड ३०.५, मालेगाव ३९.४, मंगरुळपीर ४६.७, मानोरा २९, कारंजा ३९.७ मिलीमिटर पाऊस झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.