Akola : नदीत बुडाल्याने युवकाचा मृत्यू

माहितीच्या आधारे तात्काळ एकलव्य बचाव पथकाच्या मदतीने युवकाचा मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढण्यात आला.
Akola
AkolaSakal
Updated on

अकोट - पोपटखेड परिसरातील नदीत बुडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना २७ जुलै रोजी घडली. एकलव्य बचाव पथकाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार २७ जुलै रोजी सकाळच्या सुमारास एक युवक पोपटखेड परिसरातील नदीच्या पात्रात बुडाल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली.

माहितीच्या आधारे तात्काळ एकलव्य बचाव पथकाच्या मदतीने युवकाचा मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढण्यात आला. सदर व्यक्तीची ओळख पटली असून हा युवक अकोट शहरातील हनुमान नगर भागातील रहिवाशी प्रवीण अंबुलकर असल्याची माहिती आहे.

Akola
Mumbai Water Lake Level : मुंबईची तहान भागवणारा ७ पैकी आणखी एक तलाव ओव्हरफ्लो; 'येथे' पाहा व्हिडीओ

नवजीवन एक्सप्रेसच्या मार्गात बदल

अकोला दक्षिण मध्य रेल्वेच्या हसनपर्थी-काझीपेठ मार्गावर पावसाचे पाणी धोक्याच्या पातळीच्यावर गेले आहे. त्यामुळे २७ जुलै २०२३ रोजी चेन्नई येथून सुटणारी १२६५६ चेन्नई सेंट्रल अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस चंद्रपूर, वर्धा, अकोला, भुसावळ या मार्गाने धावणार नाही. त्याऐवजी ही गाडी परावर्तित मार्ग वारंगल, सिकंदराबाद, वाडी, सोलापूर, दौंड, मनमाड, जळगाव, भुसावळ या मार्गाने धावेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

Akola
Eye Health: या कारणांमुळे डोळ्यांची दृष्टी वेळेआधीच होतेय कमकुवत?,वेळीच लक्ष द्या!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com