Akola Water Crisis : हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकणे थांबणार; २० गावांमध्ये कुपनलिकेची कामे मंजूर

उन्हाळ्यातील पाणी टंंचाई पासून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी अकोट व तेल्हारा तालुक्यातील २० गावांमध्ये पाणी टंचाई निवारणाची कामे करण्यास मंजुरी दिली आहे.
Akola Water Crisis
Akola Water CrisisSakal
Updated on

अकोला : उन्हाळ्यातील पाणी टंंचाई पासून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी अकोट व तेल्हारा तालुक्यातील २० गावांमध्ये पाणी टंचाई निवारणाची कामे करण्यास मंजुरी दिली आहे.

प्रत्येक गावात एक या प्रमाणे २० गावांमध्ये २० कुपनलिकेची कामे करण्यात येतील. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकावे लागणार नाही. सदर कामे २० एप्रिलपर्यंत पूर्ण करावी लागतील. उन्हाळ्यात ग्रामीण भागातील रहिवाशी नागरिकांना पिण्यासाठी पाणी सहज उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने प्रत्येक वर्षी पाणी टंचाई निवारण कृती आराखडा तयार करण्यात येताे.

त्याअंतर्गत यावर्षी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने जानेवारी ते मार्च २०२४ व एप्रिल ते जून २०२४ या कालावधीसाठी संभाव्य पाणी टंचाई आराखडा तयार करून जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. या आराखड्याला जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली होती. आराखड्यात मंजुरी प्राप्त उपाययोजनांपैकी जिल्हाधिकारी कुंभार यांनी कुपनलिकेच्या २० उपाययोजनांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे संबंधित गावातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

शनिवारपर्यंत कामे पूर्ण करण्याचे आव्हान

कुपनलिकेची कामे ही सन २०२३-२४च्या पाणी टंचाई काळातील असल्याने सदर कामे २० एप्रिल २०२४ पर्यंत किंवा त्यापूर्वी पूर्ण करून त्याद्वारे प्रत्यक्ष पाणी पुरवठा सुरु करण्यात यावा, असा उल्लेख जिल्हाधिकारी कुंभार यांच्या आदेशात करण्यात आला आहे. त्यामुळे सदर कामे शनिवार, २० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान यंत्रणांसमोर आहे.

कुपनलिका जलपुनर्भरण करण्याची जबाबदारी वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल विकास यंत्रणा यांची राहील. तसेच कुपनलिका अथवा विहिर अधिग्रहीत केलेली असल्यास कोणत्याही कामाअगोदर जिल्हा परिषद यंत्रणेने पाणी नमुना चाचणी घेवून जनतेस शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार असल्याबाबत खात्री करावी, असा उल्लेख जिल्हाधिकारी यांच्या आदेशात करण्यात आला आहे.

तेल्हाऱ्यात १९ तर अकोटमध्ये एक काम

पाणी टंचाई निवारणार्थ जिल्हाधिकारी यांनी मंजूर केलेल्या २० कुपनलिकेच्या उपाययोजनांपैकी तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी, वरुड बु., गाडेगाव, घोडेगाव, तुदगाव, शेरी वडनेर, शेरी बु., शेरी खु., मनात्री बु., मनात्री खु., जाफ्रापूर, वाकोडी, पिवंदळ बु.,

निंभोरा बु., निंभोरा खु., वरूड वडनेर, बाभुळगाव, तळेगाव डवला, नागरतास या गावांमध्ये कुपनलिकेचे काम हाती घेण्यात येईल. त्यासोबतच अकोट तालुक्यातील सावरगावमध्ये सुद्धा कुपनलिकेचे काम करण्यात येईल. या कामांसाठी ५० लाख ९५ हजार ४०० रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्याला सुद्धा जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()