Akola : अकोल्यात युवा साहित्यिकांची मांदियाळी

विदर्भ साहित्य संघाचे आयोजन : राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन नोव्हेंबरमध्ये
विदर्भ साहित्य संमेलन
विदर्भ साहित्य संमेलनsakal
Updated on

अकोला : युवक समाजाचा मानबिंदू असून युवकांच्या साहित्य आणि जीवन विषयक जाणिवा समृद्ध व्हाव्या, या हेतूने विदर्भ साहित्य संघाचे राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन अकोल्यात होणार असून या संमेलनाचे आयोजन विदर्भ साहित्य संघ, शाखा अकोलाद्वारे स्व.बाजीराव पाटील साहित्य नगरी, प्रभात किड्स स्कूल परिसर, वाशीम रोड येथे ता.५ व ६ नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे.

विदर्भ साहित्य संमेलन
Akola : भोंदू तांत्रिक बाबाविरुद्ध गुन्हा दाखल

विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून आयोजित या युवा साहित्य संमेलनात युवकांमध्ये साहित्यिक दृष्टी विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक अरविंद जगताप संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत तर नाशिक येथील युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक ऐश्वर्य पाटेकर उदघाटक म्हणून लाभले आहेत.

विदर्भ साहित्य संमेलन
Akola : केशवनगरचा कारखाना सुरू होणार!

अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दिलीप पांढरपट्टे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर व स्वागताध्यक्ष संग्राम गावंडे प्रमुख्याने उपस्थित राहणार आहेत.दोन दिवसीय कार्यक्रमाचा समारोप अरविंद जगताप यांच्या अध्यक्षीय मनोगताने आमदार नितीन देशमुख (बाळापूर), आमदार अमोल मिटकरी व डॉ.पं.दे.कृ.वि. कुलगुरु डॉ. शरद गडाख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

विदर्भ साहित्य संमेलन
Akola : कपाशीवर लाल्या; शेतकरी चिंतेत!

राष्ट्रगौरव दिंडीतून होणार युवा साहित्याचा जागर

युवा साहित्य संमेलनाची सुरवात राष्ट्रगौरव दिंडीने शनिवार,ता. ५ नोव्हे. रोजी सकाळी ९ वाजता होईल. या दिंडीमध्ये विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. यावेळी साहित्य दालन, कवी कट्टा, गझल कट्टा, वऱ्हाडी कट्टा आणि प्रकाशन मंचाचे उद्‍घाटन आमदार वसंत खंडेलवाल यांचे हस्ते होणार आहे.

विदर्भ साहित्य संमेलन
Akola : दारू वाहतूक करणाऱ्या टोळ्यांचा शहरात हैदोस

ऐश्वर्य पाटेकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‍घाटन

राष्ट्रगौरव दिंडीनंतर संमेलनाचे रीतसर उदघाटन युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक ऐश्वर्य पाटेकर यांच्या हस्ते व संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांच्या उपस्थितीत सकाळी १०.३० वाजता होणार आहे. विभागीय आयुक्त अमरावती आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दिलीप पांढरपट्टे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर व स्वागताध्यक्ष संग्राम गावंडे प्रमुख्याने उपस्थितीत राहणार आहेत.

विदर्भ साहित्य संमेलन
Akola : दहा महिन्यात एक लाखावर वाहनांकडून नियमभंग

सोशल मीडियावर परिसंवाद

युवकांना जागरुक करण्याच्या दृष्टीने ’सोशल मीडियावर व्यक्त होताय? जरा जपून!’ या परिसंवादाचे आयोजन ता. ६ नोव्हेंबरला दुपारी २.३० वाजता करण्यात आले. यामध्ये युवराज पाटील (लातूर), हबीब भंडारे (औरंगाबाद), उमेश अलोणे (अकोला), समीक्षाराजे खुमकर, अनंत नांदुरकर (अमरावती) यांचा सहभाग असणार आहे. अध्यक्षस्थानी नांदेड येथील सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. प्रा. पृथ्वीराज तौर हे राहणार आहेत.

विदर्भ साहित्य संमेलन
Akola : तळीरामांचा दिवाळीतच शिमगा

युवा आयकॉन पुरस्काराचे होणार वितरण

युवा साहित्य संमेलनात युवा आयकॉन पुरस्काराचे वितरण होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील तर आमदार विप्लव बाजोरिया, अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे व निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे हे राहणार आहेत.

विदर्भ साहित्य संमेलन
Akola : दानपेटी फोडून रक्कम लंपास

कविसंमेलनात होणार युवकांच्या काव्यप्रतिभेची अभिव्यक्ती

साहित्य संमेलनांच्या पहिल्या दिवशी दुपारी ४ वाजता सुप्रसिद्ध कवी डॉ. विशाल इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवींचे संमेलन राहणार असून, यामध्ये नितीन देशमुख (अमरावती), डॉ. विजय काळे (वाशीम), गोपाल मापारी (बुलडाणा), इरफान शेख (चंद्रपूर), अनंत राऊत ( पुणे), डॉ. दीपक मोहळे (वर्धा), प्रियांका गिरी (मूर्तिजापूर), गोविंद पोलाड (अमरावती) यांच्या सहभाग राहणार आहे.

विदर्भ साहित्य संमेलन
Akola : दिवाळीत वाढली फुलांची मागणी

समुपदेशनात्मक टॉक शो

आजच्या तरुणाईला दिशा देणारा ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कुळकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली, ’हो, आहे माझा बॉयफ्रेंड!’ हा समुपदेशनात्मक टॉक शो संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता आयोजित केला आहे. यामध्ये समाज माध्यम अभ्यासक पुणे येथील मुक्ता चैतन्य, शैलजा वाघ-दांदळे, जिल्हा माहिती अधिकारी, भंडारा, राजा आकाश, समुपदेशक, नागपूर, डॉ. आशा मिरगे, माजी महिला अयोग सदस्या, मुंबई यांच्या सहभाग असणार आहे. पालक, विद्यार्थी, आजी-आजोबा आणि शिक्षकवृंदांनी अवश्य ऐकावा असा हा टॉक शो असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()