अकोला : मध्य रात्री एक गाडी भरधाव जाताना पोलिसांना दिसली. संशय आला. पोलिसांनी गाडी थांबविली अन् गाडीतील दृश्य बघून थक्क झाले. मद्यधुंद (Alcohol party) अवस्थेतील गाडी चालक मित्राचा मृतदेह घेऊन चक्क फिरत होते. घातपाताचा संशय पोलिसांना आला. मात्र, शवविच्छेदनाचा अहवाल आला अन् मद्यपीच्या करून अंतावरील पडदा उघडला.
रविवारी मध्य रात्री एक वाजताच्या सुमारास रामदास पेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किशोर शेळके यांना दोन युवक सुभाष चौक येथे धिंगाणा घालत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या चारचाकी वाहनाची तपासणी केली. वाहनात मागील सीटवर एक व्यक्ती मृतावस्थेत आढळल्याने पोलिस देखील चक्रावून गेले. पोलिसांच्या तपासात एकएक कडी उलगडत गेली आणि सर्व प्रकार समोर आला.
सचिन संभाजी मोरे (३८, रा. तेल्हारा जुने शहर) व रवींद्र बोदडे (४७, रा. तेल्हारा, खार) हे दोघे सुनील उकरडे याच्यासोबत तेल्हावरून अकोल्यात येत होते. रेल्वेस्थानक चौकामध्ये दुचाकीस्वाराला कट मारल्यामुळे दुचाकीस्वारास गाडीने मागे लागला. मात्र, गाडीच्या मागील सीटवर असलेले सुनील उकरडे यांचा मृत्यू (Friend dies of suffocation) झाल्याची दोघांना माहिती नव्हती. तिघेही मद्यधुंद (Alcohol party) असल्याने पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून रात्रीच मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात रवाना केला.
बयाण आणि अहवाल झाला ‘मॅच’
मृत हा तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असल्याची माहिती आहे. तो अकोल्यात बहिणीकडे जाण्यासाठी आला होता. प्रवासादरम्यान तिघांनाही मद्य प्राशन केले. दरम्यान, त्याला उलट्या झाल्याचे दोघांनी पोलिसांना सांगितले. गाडीच्या मागच्या सीटवर त्याचा मृत्यू झाल्याची माहिती दोघांना नव्हती. शवविच्छेदनाचा अहवाल आला आणि दोन मित्रांनी दिलेल्या बयानासोबत तो मॅच झाल्याने मृत्यूचे गुढ उकलले.
अन्ननलिकेत अडकला घास
देशी व विदेशी दारू पिल्यामुळे सुनील उकरडे याची प्रकृती प्रवासातच खराब झाली होती. प्रकृती आणखी खालावत गेल्याचे मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असलेल्या मित्रांना माहित (Friend dies of suffocation) नव्हते. पोलिसांनी तपासल्यावर मित्राचा मृत्या झाल्याचे त्यांना समजले. शवविच्छेदन अहवालात गळ्यात अन्नाचे कण अडकून श्वास गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याचे पुढे आले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.