Amit Shah Visit: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करणार अकोल्याचा दौरा,'या' विधानसभा मतदारसंघात घेणार बैठक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम विदर्भासह वर्धा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत.
Amit Shah Visit: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करणार अकोल्याचा दौरा,'या' विधानसभा मतदारसंघात घेणार बैठक
Updated on

Home Minister Amit Shah Akola Visit: केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा १५ फेब्रुवारी रोजी अकोला जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम विदर्भासह वर्धा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आटोपताच लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर विदर्भातील लोकसभा मतदारसंघाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १५ फेब्रुवारी रोजी अकोला येथे येत असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली. ते अकोला येथे पश्चिम विदर्भातील अकोल्यासह अमरावती, बुलढाणा, यवतमाळ- वाशीम आणि वर्धा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत.

त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी बी. संतोष हे उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांने दिली. पाचही लोकसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी सोबत ते बैठक घेणार असून, लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची चाचपणी सुद्धा बैठकीत होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. (Latest Marathi News)

Amit Shah Visit: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करणार अकोल्याचा दौरा,'या' विधानसभा मतदारसंघात घेणार बैठक
Maharashtra Rain Update : आज राज्याच्या ‘या’ भागांमध्ये कोसळणार अवकाळी पाऊस! मराठवाडा-विदर्भासाठी हवामान खात्याचा इशारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.