Mns Vs Amol Mitkari : मनसे पदाधिकारी व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये मंगळवारी झालेल्या राड्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता मात्र आमदार अमोल मिटकरी यांच्या आईची तब्येत बरी नसल्याने दुपारी 12 वाजता नियोजीत मोर्चा रद्द करण्यात आला.
दरम्यान मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या व्यक्तींची पोलिसांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. तर मृतक जय मालोकार यांच्यावर त्यांच्या मूळ गावी निंबी मालोकार येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अकोल्यात मंगळवारी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड राडा झाला होता. यात अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड केल्याप्रकरणी मनसेच्या 13 कार्यकर्त्यांवर सिव्हील लाईन पोलीसांत गुन्हे दाखल करण्यात आले होते. यात मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांचाही समावेश होता. केअर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान हृदयविकाराच्या तिव्र झटक्यानं रूग्णालयात मृत्यू झाला होता. जयच्या मृत्युची सखोल चौकशी व्हावी, या अगोदर जयला कुठल्याही प्रकारचा त्रास (आजार) नव्हता. आता दोषींवर कठोर कारवाईची मागणी मृतकाचा मोठा भाऊ विजय मालोकार यांनी केली.
जय मालोकार मनसेच्या विद्यार्थी आघाडीचा अकोला जिल्हा उपाध्यक्ष होता. सध्या परभणी येथे होमिओपॅथी मेडिकल शिक्षणाच्या तिसऱ्या वर्षाला आहे. अकोल्यातील उमरी भागात वास्तव्यास असून गेल्या पाच वर्षांपासून मनसेमध्ये सक्रियपणे कार्यरत होता. कार्यकर्ता ते महाराष्ट्र विद्यार्थी मनसे अकोला उपजिल्हाध्यक्ष पदावर ते पोचले होते.. विद्यार्थ्यांसाठी अनेक आक्रमक आंदोलन जय मालोकार यांनी केले. सुस्वभावी व्यक्तिमत्त्वाचा जय गेल्याने निंबी मालोकार येथील त्याच्या मित्रपरिवारासह गावकऱ्यांनी अंत्यसंस्कारासाठी जमले आहेत. त्याच्या पश्चात आई, वडील व दोन भाऊ असा आप्त परिवार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.