Amol Mitkari Ravan Puja: "रावणानं बाप म्हणून सीतेचं अपहरण केलं"; अमोल मिटकरींच्या दाव्यानं वादाची शक्यता

रावण दहनावर बंदी आणली पाहिजे याची पुनरावृत्तीही मिटकरी यांनी केली आहे.
Amol Mitkari_Ravan Puja
Amol Mitkari_Ravan Puja
Updated on

अकोला : दसऱ्यानिमित्त देशभरात रावणाचं दहन करण्याची प्रथा आहे. पण रावण हा एक महान राजा होता, त्यामुळं रावणाच्या प्रतिमेचं दहन करण्यावर बंदी आणली पाहिजे. गेल्यावर्षी मी ही मागणी केली होती, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केली आहे. सीतेनं रावणाचं अपहरण केलं होतं या घटनेवर भाष्य करताना वडील म्हणून रावणानं सीतेचं अपहरण केलं होतं, असा दावाही मिटकरी यांनी केला आहे. पण त्यांच्या या दाव्यामुळं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Amol Mitkari_Ravan Puja
Dasara Melava Rally: प्रचार तोफांची आज पहिली सलामी; जाणून घ्या कोणत्या नेत्याचा कुठं होणार दसरा मेळावा

मिटकरी म्हणाले, "राजा रावण हे ग्रेटच होते या ठिकाणी त्यांची जी स्मृती जपलेली आहे, तिथं अभिवादन करण्यासाठी आम्ही दरवर्षी येत असतो. रावणाच्या प्रतिमा तयार करुन त्याचं दहन केलं जातं. पण यावर बंदी आणावी अशी गेल्या वर्षी मी देखील मागणी केली होती. दुर्देवानं मला विधीमंडळात ते मांडता आलं नाही. रामाची पूजा करणारे लोक आहेत तसेच रावणाची पण पूजा झाली पाहिजे आणि जे रावण जाळतात त्यांचे हात तरी किमान रामासारखे पाहिजेत"

Amol Mitkari_Ravan Puja
Dasara Melava : आज मेळावे : मुंडे, जरांगे काय भूमिका मांडणार? भगवान भक्तिगडावर प्रथमच येणार धनंजय मुंडे

रावण हा ज्ञानी आणि सत्पुरूष असून त्याच्यातील चांगुलपणाकडं समाजाचं दुर्लक्ष होत आहे. रावणाने सीतेचं एका बापाच्या भूमिकेतून अपहरण करत तिला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मागच्या वर्षी मी रावणमंदिराच्या जिर्णोद्धाराचा निर्णय घेतल्यानंतर मला राजकीय अडचण झाली. मला तो निर्णय मागे घ्यावा लागला. आता सामजिक संघटनांच्या मदतीने मंदिराचा जिर्णोद्धाराचे प्रयत्न करू, असा पुनरुच्चार यावेळी अमोल मिटकरी यांनी केला.

Amol Mitkari_Ravan Puja
Manoj Jarange Patil Dasara Melava: "गर्दीचा आशीर्वाद मिळवतो तो दिल्ली झुकवतो..."; जरांगेंचा हुंकार, नारायण गडावर लाखोंची हजेरी

दरम्यान, मिटकरी यांनी विदर्भातील अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील सांगोळा गावात रावणाची विधीवत पूजा केली. या ठिकाणी आदिवासी समाजाच्यावतीनं दसऱ्याच्या दिवशी रावणाची पूजा करण्याची प्रथा आहे. देशात आणखी काही ठिकाणी रावणाची पूजा केली जाते. त्यापैकी अकोला हे एक ठिकाण आहे.

भारतात दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाचा कार्यक्रम असतो. वाईट प्रवृत्तींवर विजय मिळवण्याचं प्रतिक म्हणून हा कार्यक्रम केला जातो. रामायणातील संदर्भाचा या प्रथेशी संबंध आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.