Anganwadi Recruitment : अकोला ग्रामीणसाठी अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया सुरु

एकत्मिक बालविकास सेवा योजना, प्रकल्प कार्यालय अकोला ग्रामीण अंतर्गत तालुक्यातील अंगणवाडी मदतनीस या मानधन तत्वावरील ४२ पदाची भरती
Anganwadi Helper Recruitment Process for Akola Rural started educatio
Anganwadi Helper Recruitment Process for Akola Rural started educatioesakal
Updated on

Akola News : एकत्मिक बालविकास सेवा योजना, प्रकल्प कार्यालय अकोला ग्रामीण अंतर्गत तालुक्यातील अंगणवाडी मदतनीस या मानधन तत्वावरील ४२ पदाची भरती राबविण्यात येत आहे.

याबाबतचा जाहिरनामा बुधवारी (ता. २८) जारी करण्यात आला असून पात्र महिला उमेदवारांनी ३ ते १४ जुलैपर्यंत अर्ज करावे, असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास योजना अकोला ग्रामीण यांनी केले आहे.

पदभरती प्रक्रियेत आपोती खुर्द, मारोडी, म्हैसांग, मजलापूर, घुसरवाडी, दोनवाडा, एकलारा, लाखोंडा बु., दहिहांडा, धामणा, सांगवी खु., निराट, निभोंरा, आगर, लोणाग्रा, पाळोदी, टाकळी जलम, उगवा, मंडाळा,

Anganwadi Helper Recruitment Process for Akola Rural started educatio
Akola Crime : खासगी वसतिगृहात युवतीची आत्महत्या; NEET परीक्षेची करत होती तयारी

कापशीतलाव, लोणी, चांदुर, कुरणखेड, पातूर नंदापूर, टाकळी पोटे, येळवण, देवळी, पैलपाडा, कानशिवणी, बाभुळगांव, बोरगांव मंजू, वाकी व वरोडी या गावांतील पदभरती शासन निर्णयानुसार करण्यात येत आहे.

Anganwadi Helper Recruitment Process for Akola Rural started educatio
Akola Crime : खासगी वसतिगृहात युवतीची आत्महत्या; NEET परीक्षेची करत होती तयारी

या करिता संंबंधित गावात दवंडी देण्यात येत आहे. त्या-त्या गावातील इच्छुक व पात्र महिलांनी जास्तीत-जास्त प्रमाणात अर्ज करावेत, असे कार्यालय तर्फे कळविण्यात आले आहे.

या पदासाठी किमान इयत्ता १२ वी उत्तीर्ण व स्थानिक राहिवासी असणे गरजेचे आहे. भरती संदर्भांर्तील सविस्तर अटी व शर्ती, अर्ज नमुना इत्यादी संबंधित ग्रामपंचायत कार्यालय व अंगणवाडी केंद्रात तसेच प्रकल्प कार्यालयात पाहावयास मिळेल.

ही भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व शासन निर्णयानुसार होणार असुन कुणाच्या भुलथापांना व अमिषाला बळी पडू नये, असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी अमित रायबोले यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.