Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण योजने’च्या कामावर बहिष्कार; अंगणवाडी कर्मचाऱ्यांची आक्रमक भूमिका

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत तोडगा काढत नाही तोपर्यंत अंगणवाडी कर्मचारी लाडकी बहिण योजनेचे काम करणार नाही.
anganwadi staff aggressive step for their demands boycott work of ladki bahin yojana
anganwadi staff aggressive step for their demands boycott work of ladki bahin yojanaSakal
Updated on

अकोला : अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पेंशन, मानधन व वेतनवाढ करण्यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी (ता. १८) आंदोलन केले. यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर न झाल्यास मुख्यमंत्री, महिला व बाल कल्याण मंत्र्यांसह इतरांच्या घरावर घेराव आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

त्यासोबतच मागण्यांबाबत तोडगा न निघाल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शासनाच्या लाडकी बहिण योजनेच्या कामावर बहिष्कार टाकला. सदर आंदोलन आयटकच्या वतीने करण्यात आले. गत दोन वर्षांपासून अंगणवाडी कर्मचारी वाढीव पेंशन, मानधन व वेतन वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांच्या मागण्या मंजूर होत नाहीत.

सदर मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी ५२ दिवस संप पुकारला होता. ५२ दिवसाच्या संपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शनसह भरघोस मानधन वाढ देण्याचे आश्वासन दिले होते.

परंतु अद्यापपर्यंत आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. दरम्यान शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढ, मानधन वाढ व इतर प्रलंबित मागण्यांबाबत आगामी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यातील समस्त अंगणवाडी कर्मचारी मुंबई येथे मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांचे घर, कार्यालय व इतर ठिकाणी घेराव आंदोलन करतील.

आंदोलनादरम्यान आयटकचे रमेश गायकवाड, सुनीता पाटील, नयन गायकवाड, सुरेखा ठोसर, दुर्गा देशमुख, सरोज मूर्तिजापूर, ज्योती ताथोड, महानंदा ढोक, सुनंदा पद्‍मने, आशा मदने, मंगला अढाऊ, त्रिवेणी मानवटकर, कल्पना महल्ले, वंदना डांगे, मंगला मांजरे व हजारो अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.

असहकार आंदोलन सुरू

अंगणवाडी कर्मचारी अंगणवाडीत फक्त मुलांना शिक्षण व आहार देण्यासह आरोग्य विषयक कामे करतील. परंतु जोपर्यंत शासन, प्रशासन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत तोडगा काढत नाही तोपर्यंत अंगणवाडी कर्मचारी लाडकी बहिण योजनेचे काम करणार नाही. त्यासोबतच सर्व योजनांची कामे बंद करून, मासिक अहवाल, शासकीय बैठका व योजना, सीबीई आदी कार्यक्रमांवर बहिष्कार घालून शासनाच्या विरोधात असहकार पुकारतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.