घोट घोट पाण्यासाठी वणवण भटकंती; सरपंच, ग्रामसेवकावर गावकऱ्यांचा तीव्र संताप

Anjani Burduk in Mehkar taluka is experiencing severe water scarcity.jpg
Anjani Burduk in Mehkar taluka is experiencing severe water scarcity.jpg
Updated on

घाटबोरी (बुलडाणा) : मेहकर तालुक्यामधील अंजनी बुर्दुक येथे पाणी टंचाई अधिकच तीव्रतेने जाणवत असताना, पाणी टंचाई उपाय योजना फक्त कागदावरच दिसून येत असल्याने येथील ग्रामस्थांनी सरपंच लक्ष्मी अरुण ढोले आणि ग्रामविकास अधिकारी श्री शेळके यांच्यावर तीव्र संताप व्यक्त करत आहे. 

अंजनी बुर्दुक येथे सन १९८३/८४ मध्ये परतापुरच्या शिवारात पाणीपुरवठा विहिर खोदून, ८० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधून पाईप लाईन करण्यात आली होती. परंतु गाव पुढाऱ्यांच्या आपसातील हेवेदावे, गटबाजीच्या राजकरणात पाणी पुरवठा विहिरीवरील विद्युत रोहित्र जळाल्याने अंजनी बुर्दुक येथील महिला घोट घोट पाण्यासाठी वणवण भटकंती करताना दिसत आहेत, त्यामुळे येथील ग्रामस्थ सरपंच व ग्रामसेवकावर रोष व्यक्त करत आहेत. शनिवारी दि.(०३) रोजी गावातील सामाजिक कार्यकर्ता समाधान पदमने यांनी ग्रामपंचायत सदस्य यांच्या सोबत पाण्याच्या टाकीची पाहणी केली असता, या टाकीमध्ये दोन तीन फूट  गाळ व मृत अवस्थेत पारवे पक्षी आढळून आले आहेत.

गेल्या काही वर्षांपासून याच घाणीच्या गाळातून येथील नागरिकांना पाणी पिण्यासाठी मिळत होते. ही किती अंजनी बुर्दुक गावाचे दुर्भाग्य समजावे. एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे महिलांची घोट घोट पाण्यासाठी वणवण भटकंती सुरु आहे. आता पाणी टंचाई कायम दुर करण्यासाठी कोणतीही उपाय योजना न झाल्यान गावकरी वैतागले आहेत.मुबलक पाणी असताना सुध्दा अंजनी बुर्दुक  ग्रामपंचायतची उदासीनता असलेल्यांने येथील महिला,लहान मुले यांच्या डोक्यावर कोस कोस मधुन पाण्याचे भांडे डोक्यावर आहे.तर काही नागरिक पाण्याचे टँकर विकत घेऊन आपली तहान भागवत आहेत.त्यामुळे येथील ढासळता कारभारावर गांवकरी संताप व्यक्त करत आहेत.
 
अंजनी बुर्दुक येथे गेल्या अठरा दिवसांपासून विद्युत रोहित्र जळाल्याने पाणी पुरवठा बंद आहे.अठरा दिवसात दोन वेळा विद्युत रोहित्र जळाले आहे.आज परत विद्युत रोहित्र बसवण्यात येत आहे त्यामुळे येथील ग्रामस्थांनची पाण्यासाठी पायपीट झाली,तसेच पाण्याची टाकी मध्ये बिचींग पावडर सातत्याने टाकल्यामुळे साचले आहे.व पाणी पुरवठा बंद असल्याने,टाकी धुण्यासाठी झाकण काढले होते,म्हणुन रिकाम्या टाकीत पारवा पक्षी पडलेला आढळुन आला आहे.येत्या दोन दिवसांत सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येईल.
- रामप्रकाश शेळके, ग्रामविकास अधिकारी, अंजनी बुर्दुक
 
सरपंच व ग्रामसेवक यांना वेळोवेळी पाणी समस्यासाठी निवेदन देऊन सुध्दा आम्हाला पाण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून वणवण पायपीट करावी लागत आहे.तसेच पाण्याच्या टाकीत दोन फूट गाळ असुन मृत अवस्थेत पारवे आढळून आले आहेत.सरपंच व ग्रामसेवक यांच्या उदासीनतेमुळे येथे पाणी समस्या उद्भवली आहे त्यामुळे प्रशासनाने त्वरीत लक्ष्य देऊन, पाणी पुरवठा सुरळीत करुन ग्रामस्थांची पायपीट थांबवावी हीच अपेक्षा करतो.
- महादेव शेवाळे, ग्रामपंचायत सदस्य, अंजनी बुर्दुक
 
अंजनी बुर्दक ग्रामपंचायतेच्या भोगंळ कारभारामुळे येथील महिलांच्या व लहान मुलांच्या डोक्यावर हंडा आहे,तर काही नागरिक टॅंकरचे पाणी विकत घेऊन आपली तहान भागवत आहेत.तसेच पाण्याची टाकी जिर्ण झाली आहे,या टाकीत कमीतकमी दोन फुट गाळ असुन यामध्ये मृत अवस्थेत पारवे आढळून आले आहेत तरी शासन प्रशासनाने येथे लक्ष्य घालून येथील ग्रामस्थांनची पाण्यासाठी वणवण पायपीट थांबवावी व यांच्या कागदोपत्री कारभाराची चौकशी करण्यात यावी हीच माफक अपेक्षा करतो. 
- समाधान पदमने, सामाजिक कार्यकर्ते, अंजनी बुर्दुक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.