सीडीएस परीक्षेत बुलढाण्याच्या अपूर्वचे अभूतपूर्व यश

सीडीएस (कम्बाइन डिफेन्स सव्हीस) या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणार्‍या परीक्षेचा निकाल आज (ता.24) जाहीर करण्यात आला आहे.
Apoorv Gajanan Padghan
Apoorv Gajanan PadghanSakal
Updated on

Buldhana News : देशांतर्गत घेण्यात आलेल्या सीडीएस (Combine Defense Service) या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) माध्यमातून घेण्यात येणार्‍या परीक्षेचा निकाल (Exam Result) आज (ता.24) जाहीर करण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण सैन्य दलातील आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स मधील तिन्ही गटातून बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मेरा येथील जन्मभूमी असलेल्या अपूर्व गजानन पडघान (Apoorv Gajanan Padghan) याने भारतात प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे.

भारतातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने अनुक्रमे 2679, 1136 व 637 उमेदवारांना लेखी परीक्षा देण्यासाठी भारतीय लष्करी अ‍ॅकडमी, भारतीय नेव्हल अ‍ॅकडमी आणि भारतीय वायू दल अ‍ॅकडमीमध्ये निवडण्यात आले होते. यानंतर यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची एसएसबी मार्फत परीक्षा ही सैन्य दलाच्या मुख्यालयात घेण्यात येणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील अपूर्व गजानन पडघान लहानपणापासून अभ्यासात हुशार आणि जिद्दी असल्याचे त्यांचे वडील सांगतात. जिद्द,चिकाटी,कठोर परिश्रम व अभ्यासाचे योग्य नियोजनाच्या जोरावर बुलडाणा जिल्ह्याचा अपूर्व गजानन पडघान हा विद्यार्थी युपीएससी परीक्षेत देशात प्रथम आला आहे.

Apoorv Gajanan Padghan
मुंबई : पोलिसांच्याच घरी चोरी, दुपारच्या वेळी चोरले दोन महागडे मोबाईल

अपूर्व पडघान याने मिळलेल्या यशामुळे बुलडाणा जिल्ह्याचे नाव पुन्हा प्रकाशझोतात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मेरा बु या छोट्याशा गावातील अपूर्व गजानन पडघान याने मिळविलेल्या या अभूतपूर्व यशामुळे अपूर्व या विद्यार्थ्यांचे सर्वस्तरावरून कौतुकाचा वर्षा होत आहे. अपूर्व हा लहानपणापासून अभ्यासात हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता. अपूर्वचे वडील गजानन पडघान हे विवेकानंद विद्या मंदिराचे माजी विद्यार्थी असून ते सद्या जळगाव येथे पोलिस इन्स्पेक्टर म्हणून आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत आहे तर आई शालिनी या गृहिणी आहे. अपूर्व याने एनआटी नागपूर येथून बी.टेक मॅॅकॅनिकल इंजिनिअरी पूर्ण केली आहे. महाविद्यालयीन जीवनापासून युपीएससी परीक्षेत आपल्याला यश प्राप्त करण्याचे ठरविले असल्यामुळे महाविद्यालयापासूनच युपीएससी परीक्षेच्या तयारीला लागल्याचे अपूर्व दैनिक सकाळशी बोलताना सांगितले.

अपूर्व केवळ सेल्फी स्टडीच्या जोरावर युपीएससी परीक्षेत देशात प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. अभ्यासाचे योग्य नियोजन व परिश्रमाच्या जोरावर आपल्याला घवघवीत यश प्राप्त करता आल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. युपीएससी परीक्षेत देशात प्रथम आलो असलो तरी आपल्याला एअर फोर्स मध्ये जाऊन देशाची सेवा करण्याचा मनोदय त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

Apoorv Gajanan Padghan
उत्तराखंडमध्ये भाजपला डबल दणका; मंत्र्यासह आमदाराचा राजीनामा?

आपल्या ध्येयाशी प्रामाणिक राहणे व त्यासाठी कठोर परिश्रमाची तयारी ठेवणे हाच यशाचा खरा मार्ग आहे. ग्रामीण विद्यार्थी आपल्या स्वप्नांना साकार करताना प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ न करता यश संपादक करण्यासाठी कटिबद्ध असावे.

- अपूर्व पडघान, दिल्ली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.