ASHA Sevika Strike: आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक पुन्हा संपावर! जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा

शासनाने आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तकांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. परंतु लेखी आदेश, आश्वासन किंवा जी.आर. जारी न केल्याने आशा व गटप्रवर्तकांनी शुक्रवार (ता. १२) पासून संपाचे हत्यार उगारले आहे.
ASHA Sevika Strike: आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक पुन्हा संपावर! जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा
Updated on

ASHA Sevika Strike: शासनाने आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तकांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. परंतु लेखी आदेश, आश्वासन किंवा जी.आर. जारी न केल्याने आशा व गटप्रवर्तकांनी शुक्रवार (ता. १२) पासून संपाचे हत्यार उगारले आहे. त्यामुळे आशा व गटप्रवर्तकांसह अंगणवाडी सेविकांनी शुक्रवारी (ता. १२) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना दिवाळी भेट दोन हजार रुपये दिवाळीपूर्वी देण्याचे आश्वासन, आशा स्वयंसेवकांच्या मोबदल्यात सात हजार रुपयांची वाढ, गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात दहा हजार रुपयांची वाढ करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. सदर मागण्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला व बाल विकास मंत्री, आरोग्य मंत्री, विभागाचे प्रधान सचिव, आयुक्त यांनी मान्य केल्या आहेत.

परंतु आजपर्यंत मंत्रीमंडळ बैठकीत याबाबत कोणताही निर्णय न झाल्यामुळे व लेखी आश्वासन आणि शासनादेश जारी न करण्यात आल्याने आशा सेविकांनी शुक्रवारी (ता. १२) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सदर मोर्चा अशोक वाटिका येथून काढण्यात आला. मोर्चात अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन,(Latest Marathi News)

आयटकच्या राज्य सचिव सुनीता पाटील, आयटक राज्य काउंसिल सदस्य व राज्य संगठन व जिल्हा सचिव कॉ. नयन गायकवाड, मायावती बोरकर, सुरेखा ठोसर, दुर्गा देशमुख, सरोज मूर्तिजापूरकर, ज्योती ताथोड, सुनंदा पद्‍मने, आशा मदने, मंगला अढाऊ, ज्योती ताथोड, कल्पना महल्ले, त्रिवेणी मानवटकर, प्रिया वरोटे, छाया वारके, सविता प्रधान, शालू नाईक व हजारो आशा, अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.

ASHA Sevika Strike: आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक पुन्हा संपावर! जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा
Uddhav Thackeray : कल्याण लोकसभा म्हणजे बापकी जायदाद? गद्दारांची घराणेशाही म्हणत उद्धव ठाकरेंनी फटकारले

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचाही सहभाग
राज्यातील व जिल्ह्यातील दोन लाखावर अंगणवाडी सेविका, मदतनीस ४ डिसेंबर, २०२३ रोजी पासून बेमुदत संपावर आहेत. पेन्शन, ग्रॅज्युटी व अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका यांना २६ हजार रुपये, मदतनीस यांना २० हजार रुपयांची मानधनात वाढ करण्यात यावी. अंगणवाडीसाठी पाच हजार रुपये ते आठ हजार रुपये भाडे मंजुर करावे. (Latest Marathi News)

आहाराचा ८ रुपये दर अत्यल्प असून सदर दर सर्वसाधारण बालकांसाठी १६ रुपये व अतिकुपोषित बालकांसाठी २४ रुपये असा करावा, या मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचा संप सुरू आहे. त्यांनी सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात सहभाग घेतला.

ASHA Sevika Strike: आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक पुन्हा संपावर! जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा
Mallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खरगे इंडिया आघाडीचे नवे अध्यक्ष! नितीश कुमार नाराज? नाकारले संयोजक पद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()