ASHA Workers Strike: आशा सेविकांचं राज्यव्यापी आंदोलन, चटणी भाकरी खाऊन नोंदवला निषेध

आशा वर्कर व गटप्रवर्तक संघटना अकोला-वाशीम यांच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर चटणी भाकर खाओ आंदोलन करण्यात आले.
ASHA Workers Strike: आशा सेविकांचं राज्यव्यापी आंदोलन, चटणी भाकरी खाऊन नोंदवला निषेध
Updated on

Akola Asha Workers Strike: आशा वर्कर व गटप्रवर्तक संघटना अकोला-वाशीम यांच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर चटणी भाकर खाओ आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित अशा वर्कर व गटप्रवर्तक महिलांनी चटणी भाकर खाऊन शासनाचा निषेध नोंदवला.


ता.१८ ऑक्टोबर २०२३ पासून संपूर्ण राज्यातील आशा वर्कर या राजव्यापी संपावर आहेत. आशा स्वयंसेविकांना कोणत्याही प्रकारची ऑनलाइन काम सांगण्यात येऊ नये, आशा स्वयंसेवकांना दरवर्षी दिवाळीपूर्वी एक महिन्याचा मोबदला बोनस स्वरूपात देण्यात यावा,

ऑक्टोबर २०१८ नंतर केंद्र शासनाने आशा स्वयंसेवकांच्या वेतनात वाढ केली नाही, केंद्र शासनाकडून वेतनात वाढ तत्काळ करण्यात यावी, आशा स्वयंसेवकांना किमान वेतन लागू करीत शासकीय सेवेत सामावून घ्यावे, आशा वर्कर यांना दिवाळीपूर्वी बोनस देण्यात यावा आणि प्रतिमा सात हजार वेतन देण्यात यावे आदी मागण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे.

राज्य शासनाने सदरच्या मागण्यांबाबत कोणताही विचार न केल्यास यापेक्षा तीव्र स्वरूपाची आंदोलन छेडणार असल्याचा इशारा आंदोलक आशा स्वयंसेविकांनी दिला. (Latest Marathi News)

ASHA Workers Strike: आशा सेविकांचं राज्यव्यापी आंदोलन, चटणी भाकरी खाऊन नोंदवला निषेध
Ram Temple Ayodhya Security: ATS कमांडोच्या सुरक्षेखाली अयोध्या! 360 डिग्री सुरक्षा कव्हरेजसाठी अँटी-माइन ड्रोन तैनात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()