Akola Crime : बावरीया शिकारी टोळीचे १६ जण ताब्यात; वाघाचे पंजे, नखे, शस्त्र आणि ४६ हजार रुपये जप्त

वाघाची नखे, पंजे, जप्त; देशभरातील शिकारीत समावेश
Tiger Skin
Tiger Skinesakal
Updated on

चंद्रपूर : आसाम वनविभागाने गुवाहाटी येथे बावरीया टोळीच्या तिघांना वाघाच्या कातडीसह अटक केली होती. या टोळीतील काही सदस्य चंद्रपूर व गडचिरोली वनक्षेत्रात असल्याची माहिती आरोपींनी दिली होती. याच माहितीच्या अनुषंगाने चंद्रपूर व गडचिरोली वनवृत्ताच्या संयुक्त पथकाने

गडचिरोली जिल्ह्यातील आंबेशिवणी येथून बावरीया टोळीतील सोळा सदस्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून वाघाचे पंजे, नखे, शस्त्र आणि ४६ हजार रुपये जप्त केले आहेत.आसाम येथे पकडण्यात आलेल्या शिकारप्रकरणी आणि देशातील विविध भागांतील शिकार प्रकरणांत या टोळीचा समावेश असल्याची माहिती आहे.

Tiger Skin
Akola : नाल्यात वाहून जाणाऱ्या व्यक्तीस सुखरुप वाचविले; पिंजर येथील रेस्क्यू ऑपरेशन टीमचं होतंय कौतुक

गुवाहाटी, आसाम राज्य येथे पोलिस विभाग व आसाम वनविभागाच्या पथकाने वाघाच्या शिकार प्रकरणी हरियाना राज्यातील बावरीया जमातीचे तिघांना वाघाची कातडीसह अटक केली होती. वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो, नवी दिल्ली यांनी देशातील सर्व प्रमुख व्याघ्र प्रकल्पांच्या

सभोवतालच्या क्षेत्रांत वाघांच्या शिकारीची शक्यता असल्याची सूचना दिली होती. यानंतर ताडोबा क्षेत्रसंचालकांनी तीन सदस्यांचे पथक गुवाहाटी येथे रवाना केले होते. या पथकाने गुवाहाटी येथे कारागृहात असलेल्या आरोपींची चौकशी केली.

Tiger Skin
Akola News : सराफा-पोलिस संघर्षावर स्वर्ण दक्षता समितीचा तोडगा

या चौकशीत शिकारी टोळीमधील काही सदस्य गडचिरोली वनविभागाचे क्षेत्रात फिरत असल्याची माहिती दिली. त्यानंतर वनविभागाने शोधमोहीम राबविली. गडचिरोलीजवळ आंबेशिवणी येथे तीन झोपड्यांत काही लोक राहत असल्याची माहिती मिळाली. याच माहितीच्या आधारे वनविभाग आणि पोलिसांनी छापा टाकला. या तीन झोपड्यांत शिकारीचे साहित्य, शस्त्र, वाघाची नखे, पंजे आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले.

Tiger Skin
Akola : अखेर ‘त्या’ शाळेच्या बांधकामासाठी दिली परवानगी; ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित करताच अधिकाऱ्यांचे उघडले डोळे

धागेदोरे धुळे, करीमनगरपर्यंत

वन्यजीवांच्या शिकारप्रकरणी बावरीया टोळीतील सोळा जणांना ताब्यात घेण्यात आले. तेलंगणातील करीमनगर, धुळे येथूनही काही संशयितांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे. संशयितांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मधील तरतुदींनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. देशातील विविध भागांतील शिकार प्रकरणात या टोळीचा समावेश असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास विशेष कार्य दल करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()