सुलतानपुर येथील भारतीय सैनिकाचा कर्तव्यावर असताना राजस्थान येथे मुत्यू

सैनिकाच्या कुटूबांसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
सुलतानपुर येथील भारतीय सैनिकाचा कर्तव्यावर असताना राजस्थान येथे मुत्यू
Updated on
Summary

सैनिकाच्या कुटूबांसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

सुलतानपुर (बुलढाणा) : लहानपणापासूनच देशसेवेचे स्वपन्न उराशी बाळगून प्रचंड मेहनत, जिद्द अन परिश्रमाने मागील तीन वर्षापुर्वी भारतीय सैन्यदलात भरती (Indian Army) झालेल्या सैनिकाचे रविवारी (ता. २) रात्री कर्तव्यावर असताना अचानक निधन (died) झाल्याची माहिती सोमवारी (ता. ३) सकाळी सैनिकाच्या घरी भारतीय सैनिक कार्यालय बाडमेर (राजस्थान) (rajasthan) येथून भ्रमनध्वनीवरुन कळविण्यात आल्याने सैनिकाच्या कुटूबांसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. (At Sultanpur pawan rindhe of the Indian Army has died in rajasthan)

सुलतानपुर येथील भारतीय सैनिकाचा कर्तव्यावर असताना राजस्थान येथे मुत्यू
अकोला जिल्ह्यातील १० पोलिस स्टेशनला आयएसओ मानांकन जाहिर

सुलतानपुर (ता. लोणार) येथील शेतकरी शेतमजुर कुटूबांत जन्म झालेल्या पवन विष्णु रिंढे (pawan rindhe) (वय २३) हा लहानपनापासूनच भारतीय सैन्यात भरती होवून भारतमातेच्या रक्षणाची जिद्द मनात बाळगून होता आणि त्या दृष्टीने त्याने हालाखीच्या परिस्थितही शिक्षण पुर्ण करित सैन्यात भरती होण्यासाठी आवश्यक ती शरिरयष्टी बनवून सैन्यात २०१६ -१७ च्या भरतीमध्ये तो सैन्यामध्ये भरती झाला. बेळगांव येथे सैनिक परिशिक्षण पुर्ण करुन सैनिक पवन रिंढे हे सध्या गुजरातमधील जामनगर येथे कर्तव्यांवर होते. तेथून त्यांचे युनिट प्रशिक्षणासाठी राजस्थानमधील बाडमेर येथे एक महिन्यापुर्वी गेले होते.

दरम्यान, आपल्या सहकारी सैनिकांसोबत कर्तव्यावर असताना २ मे च्या रात्री सैनिक पवन विष्णु रिंढे यांचा अचानक मृत्यू झाला असल्याची माहिती सैनिक कल्याण कार्यालय राजस्थानकडून मृतक सैनिकाच्या कुटुबांस देण्यात आली असून मृत्यूचे कारण मात्र स्पष्ट करण्यात आले नाही.

सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतक सैनिकाचे शवविच्छेदन केल्यानंतर प्रेत त्यांच्या मुळ गावी सुलतानपुर (ता. लोणार) येथे आज दुपारपर्यंत अत्यंविधीसाठी आणण्यात येणार असल्याची माहिती आहे. मृतक सैनिकाच्या मागे पत्नी आई-वडील व एक बहीण असा आप्त परिवार आहे. (At Sultanpur pawan rindhe of the Indian Army has died in rajasthan)

https://www.esakal.com/video-story/doctor-coronavirus-proper-diet

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.