Untimely Rain : अकोला जिल्ह्यात अवकाळीचा ८३२ गावांना फटका; ६४ हजार हेक्टर क्षेत्र बाधित

अकोला जिल्ह्यात २६ नोव्हेंबरच्या रात्रीपासून ते २९ नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत अवकाळी पाऊस झाला.
Agriculture Loss
Agriculture LossSakal
Updated on

अकोला - जिल्ह्यात २६ नोव्हेंबरच्या रात्रीपासून ते २९ नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत अवकाळी पाऊस झाला. पावसाचे पाणी अनेक शेतांमध्ये साचले. त्यामुळे नुकसानीचे क्षेत्र वाढले असून नुकसानीचा सुधारित प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाला पाठवण्यात आला आहे.

त्यानुसार अवकाळीचा ८३२ गावांना फटका बसला असून ६३ हजार ८६१ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यात येत आहेत.

जिल्ह्यात २६ नोव्हेंबरच्या रात्रीपासून सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली. अवकाळी पावसामुळे कापूस पिकांचं मोठं नुकसान झालं. २६ नोव्हेंबरच्या रात्रीपासून २७ नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत जिल्ह्यात ३२.६ मिमी तर २७ नोव्हेंबरच्या रात्रीपासून २८ नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत २१.१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. पावसाआधीपासून शेतशिवार कापसाने पांढरे झाले होते.

परंतु मजुरांअभावी कापसाचा वेचा थांबला. त्यातच अवकाळी पावसामुळे कापूस भिजल्याने पांढरे सोने मातीमोल झाले. तुरीच्या पिकाला आलेला बहराचा सोसाट्याचा वाऱ्यामुळे शेतात सडा पडला. दरम्यान नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्यात येत असून नुकसानीचे क्षेत्र वाढले आहे.

या पिकांना बसला फटका

गहू, हरभरा, भाजीपाला, तूर, कपाशी

यामुळे वाढले नुकसानीचे क्षेत्र

जिल्हा प्रशासनानुसार सुरुवातीला केवळ तेल्हारा, पातूर, बार्शीटाकळी व अकोला तालुक्यात नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला होता. परंतु आता इतर तालुक्यात सुद्धा नुकसान झाल्याचा अहवाल शासनाला पाठवण्यात आला आहे. त्यामुळेच नुकसानीचे क्षेत्रफळ सुद्धा वाढले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे देण्यात आली आहे.

अवकाळीमुळे झालेले नुकसान

तालुका - गावांची संख्या - बाधित क्षेत्र

अकोला - ३५ - ७१५१

बार्शीटाकळी - १६० - ३५४१

मूर्तिजापूर - १६६ - ७९१०

अकोट - १८६ - १५६५२

तेल्हारा - ७८ - ३३७८

बाळापूर - ११३ - २३२०८

पातूर - ९४ - २२१३

एकूण - ८६२ - ६३८६१

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.