अकोला : पर्यावरण रक्षणासाठी बांबू शेती, उद्योगाला चालना

पाशा पटेल : इंधन निर्मितीचा पहिला प्रयोग भारतात
Bamboo farming for environmental protection boosting industry Pasha Patel first experiment of fuel production in India akola
Bamboo farming for environmental protection boosting industry Pasha Patel first experiment of fuel production in India akolasakal
Updated on

अकोला : पर्यावरण रक्षणासाठी व पारपंरीक इंधनाला पर्याय उपलब्ध करून देण्याकरिता बांबू शेती व उद्योगाला चालना देणे आवश्यक असल्याचे मत कृषी मूल्य आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केले. अकोला येथे शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बांबूची शेती मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी करावी. कमी खर्चात जास्त उत्पादन यातून मिळते. पर्यावरणपूरक अशा या शेतीमुळे देशाचा व राष्ट्राचेही कल्याण होईल, शिवाय रोजगार उपलब्ध होणार असल्याचे पटेल म्हणाले.

लातूर येथे त्यांनी बांबूपासून तयार करण्यात येत असलेल्या वस्तूंचा व कपड्यांचा कारखाना उभारला आङे. एप्रिल महिन्यामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते त्याचे उद्‍घाटन होणार असल्याची माहिती पटेल यांनी दिली. यावेळी जिल्हा भाजप सरचिटणीस माधव मानकर, रमेश अप्पा खोपरे, गिरीश जोशी, अक्षय जोशी, मोहन पारधी, ॲड. देवाशिष काकड, अतुल अग्रवाल आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.स्वदेशी बनावटीच्या कारखान्याचा बांबूपासून इंधन कारखाना विदेशी भागीदारीतून सुरू होणार आहे.

यासंदर्भात त्यांनी पाहणी केली. या उद्योगांना लागणारा बांबू महाराष्ट्रात केवळ नंदुरबार आणि गडचिरोली जिल्ह्यातच उपलब्ध आहे. ऑक्सिजन निर्मितीसाठी बांबू लागवड आवश्यक आहे. जागतिक तापमान वाढ कमी करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांनाचा एक भाग म्हणूनही बांबू लागवडीला प्राधान्य दिले जात आहे.

वीज निर्मितीसाठी कोळशाचा वापर कमी करून टप्प्याने बंद केला जाणार आहे. पेट्रोल-डिझेल मिळणे काळासोबत बंद होईल. अशा वेळी बांबूचा वीज निर्मितीसाठी वापर होऊ शकतो. बांबूपासून इथेनॉल तयार करून पारंपरीक इंधनाला पर्याय निर्माण होऊ शकतो.

हे करीत असताना बांबू लागवडीसाठी कमी पाण्याचा वापर होऊन आणि जास्त उत्पादन शेतकऱ्यांना मिळणार असल्याचेही पाशा पटेल यांनी सांगितले. सहकारात सुद्धा बांबू शेती व उद्योगांना चालनासाठी प्रयत्न करण्याची मागणी केंद्राकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.