या प्रकरणातील आरोपी अद्यापही मोकाट असल्याने तरुणीने पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत. पोलिसांकडून हे प्रकरण मॅनेज करण्याचा प्रयत्न झाला आहे.
अकोला : दोघांनी चाकूचा धाक दाखवून तरुणीवर अत्याचार (Young Girl Abuse) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांत तक्रार देवून आज १३ दिवसांचा कालावधी उलटला तरी बार्शीटाकळी पोलिसांनी (Barshitakali police) अद्यापही आरोपींना अटक केली नसल्याचा आरोप तरुणीने केला आहे.
सविस्तर माहिती अशी की, अकोला शहरातल्या वाशिम (Washim) बायपास परिसरातल्या एका खोलीत नेत तिच्यावर दोघांनी अत्याचार केला. पीडित तरुणी ही अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील रहिवासी आहे. गावातूनच तिला बळजबरीनं उचलून नेण्यात आलं होतं. तरुणीच्या तक्रारीवरून बार्शीटाकळी पोलिसांनी चौघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
पीडित तरुणीनं दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शौचालयाला जात असताना दोन तरुण तिथे आले आणि तिला बळजबरी जिवे मारण्याचा धाक दाखवत सोबत घेऊन गेले. त्यानंतर अकोल्यातल्या वाशिम बायपास इथल्या एका खोलीमध्ये तिला आणून ठेवण्यात आलं. इथे तिच्यावर अमर आणि शुभम या दोघांनीही चाकूच्या धाकावर अत्याचार केले. कुटुंबासह तुला देखील संपवून टाकेल, अशी धमकी दोघांकडून सतत यायची. साधरणत: ही घटना ५ डिसेंबर २०२३ रोजी घडली.
त्यानंतर दोघांनी तिचे फोटो काढत तिला ब्लॅकमेल केलं आणि वारंवार तिच्यावर अत्याचार करत राहिले. २६ मार्च २०२४ रोजी पर्यंत हा सर्व प्रकार सुरूच होता. अनेक दिवस तिला दोघांनीही सोबत ठेवलं आणि अनैसर्गिकपणे तिच्यावर करत राहिले. २७ मार्च रोजी पीडित तरुणीनं त्यांच्या तावडीतून सुटका करीत घर गाठलं. घडलेला सर्व नातेवाईंकांना सांगितला.
लागलीच तरुणीनं कुटुंबासह बार्शीटाकळी पोलीस स्टेशन गाठलं आणि आपली तक्रार नोंदवली. २७ मार्चला तक्रार करूनही पोलिसांकडून त्यांना समज देण्यात देण्यात आला नव्हता. त्यानंतर दोघेही शुभम आणि अमर हे पीडित तरुणीच्या घरासमोर यायचे आणि जिवे ठार मारण्याची धमकी कुटुंबीयांना देत असायचे, म्हणून भीतीपोटी तरुणीनं तक्रार दिली नाही. अखेर ११ मे रोजी पीडिताने तक्रार दिली.
या प्रकरणातील आरोपी अद्यापही मोकाट असल्याने तरुणीने पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत. पोलिसांकडून हे प्रकरण मॅनेज करण्याचा प्रयत्न झाला आहे. आज १३ दिवस झाले तरी आरोपींना अटक करण्यात आली नसल्याबाबत तरुणी व तिच्या नातेवाईकांनी पोलिस प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात ठाणेदार शिरीष खंडारे यांनी सांगितले की, प्रकरणात पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन चौघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. आरोपींना अटक करणे आमचा अधिकार आहे. प्रकरणाचा तपास झाल्यावर निश्चित आरोपींवर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.