अकोला - जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर आणि महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. समाजातून अशा घटनांबद्दल तीव्र रोष व्यक्त होत आहेत. याच श्रृंखलेतील अकोला जिल्ह्यातील काझीखेड येथे गुरू शिष्याला काळिमा फासणारी घटना ताजी असताना अकोल्यात पुन्हा एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना उघडकीस आली. नात्यात भाची असलेल्या अल्पवयीन मुलीवर वर्षभर मामाने अत्याचार केल्याचे समोर आले. आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.