आजपासून ‘बुस्टर डोस’; अकोला जिल्ह्यात १२ हजार ५०० लाभार्थी पात्र

लसीकरणाची व्याप्ती वाढली; सर्वच केंद्रांवर व्यवस्था
Booster dose third dose
Booster dose third dosesakal
Updated on

अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांनी १० जानेवारी पासून फ्रंटलाईन वर्कर (frontline workers) आणि ज्येष्ठांना प्रिकॉनश डोस अर्थात प्रतिबंधात्मक डोस देण्याची जाहीर केले होते. त्यानुसार जिल्ह्यात(Akola district) सोमवार (ता. १०) पासून दुसरा डोस(second dose) घेवून ३९ आठवडे किंवा ९ महिने झाले आहेत, अशा लाभार्थ्यांना तिसरा डोस(The third dose) देण्यात येणार आहे.

Booster dose third dose
PM मोदींच्या सुरक्षेत चूक कोणामुळे? सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

जिल्ह्यातील सर्वच लसीकरण केंद्रांवर सदर डोस संबंधितांना देण्यात येईल. शहरी भागात त्यासाठी ऑनलाईन तर ग्रामीण भागात ऑफलाईन अपॉईंटमेंटची सुविधा असेल. जिल्ह्यातील १२ हजार ५०० लाभार्थ्यांना दुसरा डोस घेवून ९ महिने झाले आहेत, त्यामुळे सुरुवातीला त्यांनाच तिसरा डोस देण्यात येईल.

Booster dose third dose
शरद पवार यांच्या उपस्थितीत आज एसटी संपाबाबत कृती समितीची बैठक

ओमिक्रॉन व्हेरियंटचा वाढता धोका व कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता घेता सदर लाट थोपवण्यासाठी लसीकरण हाच एकमात्र उपाय असल्याचे सांगितल्या जात आहे. त्यामुळे लसीकरणाची गती वाढवण्यासाठी व अधिकाधिक नागरिकांना लस मिळावी यासाठी मिशन कवच कुंडल अभियानानंतर आता केंद्र सरकारने लसीकरणाची व्याप्ती वाढवली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या वाढत असली तरी दुसरा डोस घेण्यासाठी अधिकाधिक नागरिकांना प्रोत्साहित करण्यात आले.

दरम्यान आता सोमवार (ता. ९) पासून जिल्ह्यातील फ्रंटलाईन वर्कर व ज्येष्ठांना कोरोनाचा तिसरा डोस देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शंभरावर केंद्रांवर सदर डोस घेण्याची सुविधा असले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.