तीन मिनीटांचे रेस्क्यू अन् दोघा भावंडांना जीवदान

पंढरपुरातील चंद्रभागेत अकोला जिल्ह्यातील पथकाचे थरारक बचाव कार्य
Both siblings were saved thrilling operation of rescue squad
Both siblings were saved thrilling operation of rescue squad
Updated on

अकोला - चंद्रभागा नदी पात्रातील ते ३० सेकंद... एक भाऊ वाहत जात आहे...तर दुसरा त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात...अन् तीन मिनीटांचे ते थरारक रेस्क्यू ऑपरेशन... विठ्ठलचं पावला... बचाव पथकाच्या थरारक ऑपरेशनने दोन्ही भावंडांना जीवदान मिळाले.

अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी चंद्रभागा नदीच्या पात्रात अवघ्या तीन मिनिटांच्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये दोन भावंडांना जीवदान दिले. इस्काॅन घाटाच्या डाव्याबाजूला नदीच्या काठावर उभे असलेले वारकरी आरडाओरडा करत धावा- धावा असे जोर जोरात ओरड होते. ते ऐकून जीवरक्षक दीपक सदाफळे आणि त्यांच्या पथकतील सदस्यांचे लक्ष तिकडे गेले. तेव्हा दोन भाऊ चंद्रभागा नदीच्या मध्यभागातून पोहत असताना मध्येच दम सरल्याने बुडू लागल्याचे दिसून आले. आता आपण पाण्यात बुडणार या भितीने दोघांनी एकामेकांना मिठी मारली. अगदी त्याच क्षणी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकातील जवानांनी पाण्यात उडी घेवून दोन्ही भावंडांना मृत्यूच्या दारातून दोघांनाही सुखरुप बाहेर आणले.

अन् जय हरी विठ्ठलाचा आवाज गुंजला

दोघे भाऊ पाण्यात बुडत असल्याचे दिसताच तेथे तैनात असलेले जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी रेस्क्यू बोट दिशेने वळविली. लगेच टाॅपर अंडर वाॅटर स्विमर पथकाचे जवान ज्ञानेश्वर म्हसाये, अतुल उमाळे यांना पोजिशन घ्यायला सांगितले. दुसऱ्या बोटमधील नगरपरिषदेचे कर्मचारी प्रज्वल प्रचंडराव दोन लाईफरींग घेऊन त्या भावंडांजवळ फेकण्यासाठी सज्ज होते. अवघ्या एका मिनटात भावंडांजवळ रेस्क्यु बोट पोहोचली. त्यांच्या दिशेने लाईफरिंग फेकल्या. क्षणार्धात दोन्ही स्विमर झेप घेऊन डोक्यापर्यंत बुडालेल्या अवस्थेतील दोन्ही भावंडांजवळ पोहोचले. त्यांना पाण्यातून वर काढले. त्याच क्षणी काढावरील वारकऱ्यांच्या मुखातून उत्स्फुर्तपणे आवाज आला..‘जय हरी विठ्ठल माऊली’. दोघांनाही तहसीलदार चव्हाण यांच्या मदतीने वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. दोघांचीही प्रकृती ठणठणणीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

ते भावंड विरारचे रहिवाशी

पंढरपुरच्या चंद्रभागा नदीत बुडत असलेले जितेंद्र अजयकुमार कहाळ (२२) व अभिजीत अजयकुमार कहाळ असे त्यांची नावे आहेत. ते मंगलमूर्ती अपार्टमेंट, विरार, जि. पालघर येथील रहिवाशी आहेत. संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे जवान आज आमच्यासाठी देवदुत ठरले असल्याची भावना दोघांनीही व्यक्त केली. या ऑपरेशनमध्ये दीपक सदाफळे यांच्यासोबत पथकाचे स्वयंसेवक ज्ञानेश्वर म्हसाये, अतुल उमाळे, ऋषीकेश राखोंडे, मयुर सळेदार, ऋषीकेश तायडे, उमेश बिल्लेवार, अजय डाके, मयुर कळसकार, विकी साटोटे, सूरज ठाकुर, निखील ठाकरे, राम काकड, विक्की पिंजरकर, शिवम वानखडे, शुभम भोपळे, अंकुश चांभारे, मुन्ना अंधारे,अक्षय ठाकरे, सार्थक वानखडे, गोविंदा ढोके यांनी सहभाग घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()