Buldhana Accident News: भरधाव ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात; ऐन भाऊबीजेच्या दिवशी 3 तरुणांचा मृत्यू

ऐन दिवाळी सणामध्ये बुलढाणा जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे.
Jat Accident News
Jat Accident NewsEsakal
Updated on

ऐन दिवाळी सणामध्ये बुलढाणा जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. बुलढाणा जिल्ह्यात भरधाव वेगात असणाऱ्या ट्रॅव्हल्सने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना बुधवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास नॅशनल हायवे क्रमांक ६ वरील वडनेर गावाजवळ घडली आहे.

या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. स्वप्निल करणकार (वय २७ वर्ष, राहणार जळगाव खान्देश) गोपाल शालिक राणे (वय ३४ वर्ष, राहणार वराड तालुका भुसावळ), आकाश राजू आखाडे राहणार कल्याण अशी मृत तरुणांची नावे आहेत. ऐन भाऊबीजेच्या दिवशी ३ तरुणांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Jat Accident News
Manoj Jarange: पहाटे ४ वाजता कडाक्याच्या थंडीत मनोज जरांगेंनी घेतली सभा; बोलताना म्हणाले 'तुमचे ऋण...'

मिळालेल्या माहितीनुसार, हे तरुण काल (बुधवारी) रात्री १२ वाजण्याच्या सुमारास नॅशनल हायवे क्रमांक ६ येथून दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी मलकापूर येथून नांदुराकडे प्रवाशांना घेऊन ट्रॅव्हल्स भरधाव वेगाने निघाली होती. दरम्यान, वडनेर गावाजवळ ट्रॅव्हल्सने दुचाकीला जोरदार धडक दिली आणि हा भीषण अपघात घडला.

Jat Accident News
अजितदादांचं टेन्शन वाढवणारी बातमी! 'या' आमदारानं अचानक घेतली शरद पवारांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

दरम्यान, अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी मलकापूर येथील रुग्णालयात पाठवले आहेत. याप्रकरणी ट्रॅव्हल्स चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आधिक तपास करत आहेत.

Jat Accident News
Blue whale: गणपतीपुळे समुद्रकिनारी आलेल्या देवमाशाच्या पिल्लाचा अखेर मृत्यू, ऑपरेशन ब्लू व्हेल अपयशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.