संग्रामपूर : हवामान बदलाचे विपरीत परिणाम शेती आणि शेतकऱ्यांना सातत्याने भेडसावत आहेत. त्यातही पाऊस हा फॅक्टर सर्वाधिक जबाबदार ठरतो आहे. पावसाळ्याचे चार महिन्यात केवळ ५० ते ५५ दिवसच पाऊस होत असल्याने जोराचा पाऊस, खंड अशा समस्या उदभवत आहेत. शिवाय अवकाळी पावसाचेही प्रमाण कमालीचे वाढले आहे.
बुलडाणा जिल्हयात मागील पाच वर्षातील पावसाचे प्रमाण लक्षात घेतले तर पाऊस सरासरीच्या ९० टक्क्यांवर पाऊस होत आहे. परंतु असमतोल पावसाने चिंता वाढवल्या आहेत. पावसाळ्याचे चार महिने म्हणजेच १२० दिवस राहतात.
या काळात समतोल स्वरुपाचा पाऊस झाला तर खरीप हंगाम चांगल्यापैकी साधू शकतो. मागील काही वर्षात हे चक्र पुर्णपणे बदलले आहे. आता पावसाळ्यात पाऊस सरासरीपर्यंत जातो. मात्र, या पावसाचे दिवस हे इतके असमतोल झालेले आहेत की पाऊस पडला तर तासाभरात ढगफुटीसदृश्य होतो.
सर्वत्र नदी-नाले ओसंडून वाहू लागतात. एकाच शिवारात काही अंतरावर अशा प्रकारचा पाऊस पडलेलाही नसतो, अशी विचित्र परिस्थिती अनेक गावात शेतकरी अनुभवतात. खरिपात पाऊस पडल्यानंतर पेरण्या होत असतात.
पण हा पाऊस आता मृग नक्षत्रात पुरेसा येत नसल्याने पेरण्याही सुरु होत नाहीत. कधी कधी पेरणी जुलैच्या अखेरपर्यंत होते. काही भागात आॅगस्टमध्येही पेरणी धरली जाते. या उशिराने होणाऱ्या पेरणीमुळे मूग, उडदासारखे कमी कालावधीचे पिक क्षेत्र सातत्याने घटू लागले आहे.
तसेच सुरुवातीला पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना जून-जुलैतील पावसाच्या खंडाचा फटका बसतो. दुबार पेरणीही करावी लागते. सोयाबीनसारख्या प्रमुख पिकाच्या कमी व अधिक कालावधी घेणाऱ्या वाणांच्या लागवडीवरही परिणाम होतो आहे.
पाऊस हा पीक काढणीच्या काळात अधिक झाल्याने शेतकऱ्याच्या उत्पादनाचे नुकसान, शेतमालाचा दर्जा खालावण्यासारखे प्रकार दरवर्षी होऊ लागले आहेत. अशा या विचित्र पाऊस मानाचा फटका सतत बसत असल्याने शेतकऱ्याचे अर्थकारण बिघडत आहे. सोयाबीनसह इतर विविध पिकांचे उत्पादन कमी होत आहे. पावसावर आधारीत या शेतीपद्धतीसमोर हवामान बदलाचे मोठे आव्हान उभे ठाकलेले आहे.
२०१९-२० ६९७ (९२ टक्के) ५४
२०२०-२१ ७८६ (१०३ टक्के) ५६
२०२१-२२ ८६४ (११३ टक्के) ५३
२०२२-२३ ८१०(१०६ टक्के) ५६
२०२३-२४ ६९० (९१ टक्के) ५१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.