Buldhana News : वऱ्हाडींच्या लक्झरी बसने घेतला पेट;४५ प्रवासी थोडक्यात बचावले,बसचा झाला कोळसा

चिखली येथील मेहकर फाट्यावर लग्नाचे वऱ्हाड घेऊन आलेल्या एका खाजगी बसने अचानक पेट घेतला. ही घटना आज (ता. २५) रोजी पहाटे चारच्या सुमारास घडली. मेहकर फाट्यावर गाडीमध्ये डिझेल भरले आणि अचानक चालकाला गाडीच्या वायरिंगने पेट घेतल्याचे लक्षात आले.
Buldhana News
Buldhana Newssakal
Updated on

चिखली : चिखली येथील मेहकर फाट्यावर लग्नाचे वऱ्हाड घेऊन आलेल्या एका खाजगी बसने अचानक पेट घेतला. ही घटना आज (ता. २५) रोजी पहाटे चारच्या सुमारास घडली. मेहकर फाट्यावर गाडीमध्ये डिझेल भरले आणि अचानक चालकाला गाडीच्या वायरिंगने पेट घेतल्याचे लक्षात आले. तत्काळ गाडीतील सर्व वऱ्हाडी मंडळींना गाडीतून खाली उतरवले आणि काही वेळातच संपूर्ण लक्झरी बसचा कोळसा झाला. या बसमध्ये ४५ प्रवासी प्रवास करीत होते. मात्र सुदैवाने कोणालाही हानी झाली नाही.

याबाबत सविस्तर असे की, बुलडाणा येथील अरुण राठोड यांच्या मुलाचे चंद्रपूर येथे २४ जून रोजी लग्न झाले. या समारंभासाठी खासगी लक्झरी बस क्र. एम. एच. ०४, जी.पी.८००८ हिने संपूर्ण वऱ्हाडी चंद्रपूर येथे गेले होते. लग्न सोहळा आटोपून ते समृद्धी महामार्गाने येत बुलडाणासाठी निघाले. परत यायचे म्हणून लक्झरी चालक विलास पवार यांनी समृद्धी मार्गावरील मेहकर येथील इंटरचेन्ज वरून लक्झरी बस खाली उतरविली.

दरम्यान बुलडाणा येथे येत असताना चिखली नजीक मेहकर फाट्यावरील पेट्रोल पंपावर गाडीमध्ये डिझेल भरले. गाडी चालू करताच वायरिंग जळाल्याचा वास येवू लागल्याचे चालकाच्या लक्षात आले. दरम्यान प्रसंगावधान राखून चालकाने गाडीतील सर्व वऱ्हाडी मंडळींना खाली उतरविले. यानंतर काही क्षणातच संपूर्ण गाडीने पेट घेतला. अक्षरशः लक्झरी बसचा कोळसा झाला. मात्र या घटनेत बस चालक विलास राठोड यांच्या सतर्कतेमुळे सर्वांचे प्राण वाचले. मात्र बससह लग्न वऱ्हाडीचे साहित्यही जळून खाक झाले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता, घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. वृत्त लिहेपर्यत कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

त्या घटनेची आठवण

वर्षभरापूर्वी बुलडाणा येथील समृद्धी महामार्गावर नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसला भीषण अपघात झाला होता. ही बस खांबाला धडकून उजव्या बाजूच्या संरक्षक कठड्यावर आदळली आणि डावीकडे पलटी झाली, नंतर काही क्षणातच तिने पेट घेतला. या अपघातात बसमधील २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. पेटलेल्या बसने या अपघाताच्या आठवणी ताज्या केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com