buldhana water storage 38 percent water scarcity monsoon rain weather forecast
buldhana water storage 38 percent water scarcity monsoon rain weather forecastsakal

Buldhana Water Storage : बुलडाणा जिल्ह्यात धरणामध्ये ३८ टक्के जलसाठाः संभाव्य पाणीटंचाई

पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याहून अधिक कालावधी झाला तरी अद्यापही प्रकल्प क्षेत्रात दमदार पाऊस झाला नाही.
Published on

बुलडाणा : पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याहून अधिक कालावधी झाला तरी अद्यापही प्रकल्प क्षेत्रात दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळेच आजही जिल्ह्यातील मोठे तीन, मध्यम सात व लघु ४१ प्रकल्पातील जलसाठा पाहिजे त्या प्रमाणात वाढलेला नाही.

त्यामुळे काही प्रकल्प वगळता इतर प्रकल्प तहानलेलेच आहेत. या सर्व प्रकल्पांमध्ये एकूण ३८ टक्केच जलसाठा आहे. जिल्हा पाटबंधारे विभागाने १ ऑगस्ट रोजी सादर केलेल्या जलाशय पातळीच्या अहवालात प्रकल्पांनी जलसाठ्याची टक्केवारी पन्नाशीच्या आत असल्याचे नमूद केले आहे.

त्यामुळे जर पावसाची अशीच परिस्थिती राहिली तर पाणी टंचाईचे संकट बिकट होऊन भविष्यात शेती सिंचनाचा प्रश्नही निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यामध्ये लघु, मध्यम व मोठे असे एकूण ५२ प्रकल्प आहेत.

buldhana water storage 38 percent water scarcity monsoon rain weather forecast
Katepurna Dam : अकोल्यातील ‘काटेपूर्णा’चे चार गेट उघडले

यापैकी प्रकल्पावरून जिल्ह्यातील शहर व अनेक गावांचा पाणीपुरवठा नळ योजनेच्या माध्यमातून केला जातो तर काही प्रकल्प सिंचनासाठी पाणीपुरवठा करतात. त्यामु‌ळे जिल्ह्यातील प्रत्येक प्रकल्पातील पावसाळ्यात जलपातळी वाढणे म्हणजेच भविष्यातील पाणीटंचाई व सिंचनाचा प्रश्न मिटणे होय.

त्यामुळे पावसाळ्यात या प्रकल्पातील जलसाठ्यात कशा पद्धतीने वाढ होते. याकडे अनेकांचे लक्ष असते. पावसाळा ७ जूनपासून प्रत्यक्षात सुरू झाला आहे. परंतु पाहिजे त्या प्रमाणात या प्रकल्पातील जलसाठा वाढलेला नाही. जिल्ह्यातील प्रकल्प क्षेत्रामध्ये आत्तापर्यंत एकूण किती मिमी पाऊस झाला याची नोंदही जिल्हा पाटबंधारे विभागाने केली आहे.

buldhana water storage 38 percent water scarcity monsoon rain weather forecast
Akola Rain News : दोन आठवड्यांपासून पावसाचा जोर कायम; उशिरा पेरण्या झालेल्या शेतांमध्ये डवरणे, फवारण्या रखडल्या

काही प्रकल्पांची जलाशयाची साठवणूक क्षमता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे अशा प्रकल्प क्षेत्रात आजही शून्य टक्के जलसाठा वाढला आहे. वास्तविक पाहता खडकपूर्णा प्रकल्प क्षेत्रामध्ये २८२ मिमी पाऊस झाला आहे.

अशी आहे जलसाठ्याची टक्केवारी

मोठ्या प्रकल्पांपैकी आजही खडकपूर्णा प्रकल्पातील जलसाठा शून्य आहे. तर नळगंगा ३६१७, पेनटाकळी १४.८०, असा या तीन प्रकल्पात एकूण १५.७६ टक्के जलसाठा आहे. तर मध्यम प्रकल्पांपैकी ज्ञानगंगा ४१.२४, मस ९३.९५ कोराडी १४.५५,

buldhana water storage 38 percent water scarcity monsoon rain weather forecast
Akola : पीक विम्याचा लाभ पात्र शेतकऱ्याला मिळावा; आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

पलढग ६२.७२, मन २६.३१, तोरणा २८.३९, उतावळी २६.७८, कोराडी (को. प.ब.) २ अशा सात प्रकल्पांमध्ये ३८.४० टक्के जलसाठा आहे. तर ४१ लघु प्रकल्पांमध्ये एकूण १७.९५ टक्के जलसाठा असून अशा प्रकारे जिल्ह्यातील ५२ प्रकल्पांमध्ये जलसाठा आहे.

प्रकल्प क्षेत्रात १ जूनपासून पडलेला पाऊस

नळगंगा प्रकल्प क्षेत्रात १९५ मिमी, पेनटाकळी २८५ मिमी, खडकपूर्णा २९७ मिमी असा ज्ञानगंगा प्रकल्प क्षेत्रात ३४२ मिमी, मस प्रकल्प क्षेत्रात ४६० मिमी, कोराडी प्रकल्प क्षेत्रात ५७५ मिमी, पलढग प्रकल्प क्षेत्रात ४३८ मिमी, मन प्रकल्प क्षेत्रात ३८७ मिमी, तोरणा प्रकल्प क्षेत्रात ३७६ मिमी, व उतावडी प्रकल्प क्षेत्रात ३७६ मिमी पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.