Akola Assembly Election 2024 : मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा आधार

Campaigning On Social Media: सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांकडून प्रचार केला जात आहे. उमेदवारांकडून प्रचाराचा धुराळा : व्हिडीओ, रील्सच्या माध्यमातून प्रचार वाढला
Social Media
Campaigning On Social MediaSakal
Updated on

अकोला : विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीर प्रचाराची सांगता सोमवारी झाली. आता उमेदवारांकडून सोशल मीडियाचा वापर वाढल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांकडून प्रचार केला जात आहे. सोशल मीडिया प्रभावी माध्यम असल्याने व्हिडिओ, रील्सच्या माध्यमातून प्रचारावर भर दिला जात आहे.

आतापर्यंत उमेदवारांनी प्रत्यक्ष गाठीभेटीसह भर देत प्रचार केला. दरम्यान, आता जाहीर प्रचार करण्याची मुदत संपली आहे. जास्तीतजास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांकडून व्हॉटसॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मेसेज, रील्स, व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल करून मतदान करण्याचे आवाहन केले जात असल्याचे चित्र आहे.

एकेकाळी निवडणूक रिंगणातील उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते माहिती पत्रक, जाहीरसभा आणि थेट भेटीगाठी घेत प्रचार करायचे. आता या पारंपरिक पद्धतीसह प्रचारासाठी सोशल मीडियाचा अधिक वापर वाढल्याचे दिसून येत आहे.

सोशल मीडियातून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी मदत होत असल्याने सर्वच उमेदवार मोठ्या प्रमाणात डिजीटल प्रचारावर भर देताना दिसत आहेत. जिल्ह्यातील पाचही मतदारासंघातील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार केला जात आहे. उमेदवारांचे कार्यकर्तेही सोशल मीडियावर सक्रिय झाल्याचे दिसत आहेत. सध्या उमेदवार घरातून बाहेर पडताच त्यांच्यासमवेत सोशल मीडिया टीम असते. उमेदवाराचा दिवसभरातील सर्व कार्यक्रम ते मतदारांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.

Social Media
Nagpur East Assembly Election : पूर्व नागपूरच्या निवडणुकीत अपक्ष कुणाला देणार धक्का? चौरंगी लढतीने निवडणुकीत चुरस

सोशल मीडियावर करडी नजर

निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील मतदारसंघात सत्ताधारी आमदार आणि विरोधकांमध्ये सोशल मीडिया वॉर रंगल्याचे दिसून येत आहे. एकमेकांचे कार्यकर्ते विरोधकांवर टीका करणाऱ्या पोस्ट व्हायरल करताना दिसत आहेत.

दरम्यान, आक्षेपार्ह मेसेज व्हायरल करणाऱ्यांवर निवडणूक विभागाची करडी नजर आहे. त्यामुळे सोशल मीडियावर संदेश प्रसारित करताना खबरदारी घ्यावी लागत आहे. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेदवारांचे कार्यकर्ते आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत.

Social Media
Nagpur Assembly Constituency's 2024 : मतदान केंद्रांवर कुठलीही गैरसोय होणार नाही : जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

ऑनलाइन कंटेन्टला मागणी

विधानसभा निवडणुकीत रील्स तयार करणाऱ्यांना सर्वाधिक मागणी आहे. दीर्घ व्हिडीओपेक्षा एक ते दीड मिनिटाचे रील्स सर्वाधिक पाहिले जातात.

त्यामुळे उमेदवारांच्या प्रचारादरम्यानच्या रील्सच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. दर्जेदार ऑनलाइन कंटेन्टला मागणी वाढली आहे.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.