सीईटी अर्जासाठी आणखी एक संधी; उदय सामंत यांनी दिली माहिती

सीईटी अर्जासाठी आणखी एक संधी; उदय सामंत यांनी दिली माहिती
Updated on

अकोला : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी परीक्षेपासून राज्यातील हजारो विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता होती. याबाबत ‘सकाळ’ने ता. ७ ऑगस्टच्या अंकात परीक्षेपासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न मांडला होता. त्याची दखल घेत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विट करून अर्ज न करू शकलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी म्हणून १२ ते १६ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची सुविधा दिली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांच्या मार्फत अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषध निर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी २०२१ प्रवेश परीक्षा राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. या परीक्षेची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. मात्र, अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना दिलेली मुदत १५ जुलै रोजी संपली होती. या मुदतीत अर्ज न करू शकलेल्या हजारो विद्यार्थ्यांना आता राज्य सामाईक परीक्षा कक्षाने अर्ज करण्यासाठी पाच दिवसांची मुदत दिली आहे.

सीईटी अर्जासाठी आणखी एक संधी; उदय सामंत यांनी दिली माहिती
नर्सिंगच्या विद्यार्थिनीच्या दोन्ही किडन्या निकामी; मदतीचे आवाहन

परीक्षेपासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. ‘सकाळ’ने ता. ७ ऑगस्टच्या अंकात याबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना आता १२ ते १६ ऑगस्टपर्यंत पुन्हा अर्ज करता येणार असल्याचे ट्विटरवरून जाहीर केले. ‘सकाळ’च्या पाठपुराव्यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्यापासून वाचणार आहे.

काय म्हणाले उच्च व तंत्र शिक्षणमंत्री?

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ me साठी तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी २०२१ या प्रवेश परीक्षांसाठी आतापर्यंत ऑनलाइन अर्ज न केलेल्या उमेदवारांसाठी एक विशेष बाब म्हणून १२ ते १६ ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी संधी देण्यात येत आहे. तसेच यापूर्वी नोंदणी केलेल्या उमेदवारांना अर्जामधील दुरुस्ती करण्यासाठी ता. १४ ते १६ ऑगस्ट या कालावधीत संधी देण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी ‘महासीईटी’ या संकेत स्थळाला भेट द्यावी, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

सीईटी अर्जासाठी आणखी एक संधी; उदय सामंत यांनी दिली माहिती
अल्पवयीनचा जबरदस्तीने गर्भपात; खुंटीवर पिशवीमध्ये ठेवले अर्भक
सीईटीसाठी अर्ज करण्याच्या १५ जुलै या मुदतीत हजारो विद्यार्थी अर्ज करू शकले नाही. त्यांना अर्ज करण्यासाठी विद्यापीठांच्या धरतीवर मुदत देण्याचा प्रश्न ‘सकाळ’ने लावून धरला. त्यामुळे आज हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे.
- डाॅ. संजय खडक्कार, राज्यपाल नामित माजी व्यवस्थापन परिषद सदस्य, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.