- श्रीकांत राऊत
अकोला : जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी शासनाने नियमांमध्ये महत्वाचे बदल केले आहेत. जन्म-मृत्यू दाखल्यासाठी आता २१ दिवसांत अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रमाणपत्रासाइ ३० दिवसांनंतर अर्ज केल्यास त्याला जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांची मंजुरी बंधनकारक घ्यावी लागणार आहे. या बदलामुळे नागरिकांना प्रमाणपत्र मिळविण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.