अकोला - ‘विविध राज्यांमधील काँग्रेस सरकारांचा शाही परिवार एटीएम म्हणून वापर करीत असून महाराष्ट्राला काँग्रेसचे एटीएम होऊ देणार नाही,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथील जाहीर सभेत काँग्रेसवर घणाघाती टीका केली. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मैदानावर आयोजित महाविजय संकल्प सभेला उद्देशून भाषण करताना त्यांनी काँग्रेसने सुरुवातीपासून जातीजातींत भेद निर्माण केल्याचा आरोप केला.