अकोला जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग वाढला

नागरिकांनो काळजी घ्या; दिवसभरात आढळले ५८ नवे रुग्ण
Corona Patients
Corona PatientsSakal
Updated on
Summary

नागरिकांनो काळजी घ्या; दिवसभरात आढळले ५८ नवे रुग्ण

अकोला : कोरोना(corona) संसर्गामुळे बाधित होणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात (corona)दिवसेंदिवस वाढत आहे. बाधितांची संख्या वाढत असली तरी नागरिक मात्र अद्याप बेफिकीर असून बाजारासह रस्त्यांवर गर्दी दिसत आहे. दरम्यान शुक्रवारी (ता. ७) दिवसभरात ५८ नवे रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील(akola district corona update) एकूण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १७७ झाली आहे.

Corona Patients
अकोला : नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या व्‍यावसायिकांवर कारवाई

विदेशात कोरोनाचा व्हेरियंट ओमायक्रॉन(omicron varient) धुमाकूळ घालत असून अनेक देशांमध्ये कोरोनाचा विस्फोट होत आहे. देशात सुद्धा कोरोना बाधितांची संख्या दररोज दुपटीने वाढत आहे. राज्याची राजधानी मुंबई येथे तर दररोज १५ ते २० हजारांवर कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यासोबतच इतर जिल्ह्यात सुद्धा कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट सुरू झाल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

दरम्यान जिल्ह्यात गत सात दिवसांत १६६ नवे रुग्ण आढळले आहेत. सदर सर्वच रुग्ण घरातच उपचार घेत असल्याने कोरोनाच्या संसर्गाची साखळी तुटण्यायेवजी वाढण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान १ जानेवारी रोजी जिल्ह्यात कोरोनचे दोन रुग्ण आढळले होते. त्यानंतर २ जानेवारी रोजी एक, तीन जानेवारी रोजी १०, चार जानेवारी रोजी २८, पाच रोजी ३२ तर सहा जानेवारी रोजी ३५ तर सात जानेवारी रोजी ५८ रुग्ण आढळले. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात कोरोनाच्या १७७ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे.

Corona Patients
नागपूर : चार दिवसांत २५ टक्क्यांवर विद्यार्थी झाले लसवंत

ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पाहोचली १७७ वर

कोरोना आरटीपीसीआर संसर्ग तपासणीचे शुक्रवारी ७ जानेवारी रोजी जिल्ह्यात ५२० अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ४६९ अहवाल निगेटिव्ह आले, तर ५० अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यासोबतच खासगी लॅबमध्ये चार तर रॅपिडच्या चाचणीत चार अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे ७ जानेवारी रोजी जिल्ह्यात ५८ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे आता जिल्ह्यात कोरोनाच्या १७७ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.