सायकल रॅलीद्वारे कोविड लसीकरण जनजागृती

जिल्ह्यामध्ये कोविड लसीकरण मोहीमेची जनजागृती व्हावी
जिल्हाधिकारी कार्यालयातून काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये सहभागी अधिकारी व इतर
जिल्हाधिकारी कार्यालयातून काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये सहभागी अधिकारी व इतरsakal
Updated on

अकोला : भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यामध्ये कोविड लसीकरण मोहीमेची जनजागृती व्हावी, याकरीता शनिवारी सकाळी ७.३० वाजता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयातून काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये सहभागी अधिकारी व इतर
समाज कल्याणच्या योजनांचे ‘सामाजिक परिणाम मूल्यांकन’

सायकल रॅलीत जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच विविध विभागांचे शासकीय अधिकारी, कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा संस्थांचे प्रतिनिधी, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना विद्यार्थी आदी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयापासून सकाळी ७.३० वाजता रॅलीस जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सरकारी बगीचा-जयहिंद चौक-छोटा पूल-सावताराम मिल रोड-मानिक टॉकीज-संतोषी माता चौक मार्गे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वसंत देसाई स्टेडियम येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.