Crop Insurance : पीक विम्याचे दस्तऐवज देण्यास टाळाटाळ भोवली; अग्रो कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

Crop Insurance : एचडीएफसी अग्रो कंपनीच्या अधिकाऱ्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल; शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान.
Crop Insurance
Crop Insurance sakal
Updated on

बाळापूर, विमा कंपनीने पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची सर्वेक्षण यादी, पात्र व अपात्र यादी कृषी विभागाकडे सादर न केल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याने एचडीएफसी अग्रो कंपनीच्या राज्य व विभागीय प्रतिनिधींच्या विरोधात बाळापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

जिल्हा प्रतिनिधी सुनील लक्ष्मण भालेराव व विभागीय प्रतिनिधी प्रकाश श्रीवास्तव असे गुन्हा दाखल झालेल्या प्रतिनिधींची नावे आहेत.‘एचडीएफसी अग्रो’ कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांनी खरीप आणि रब्बी हंगाम २०२३-२४ साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे कागदपत्रे अनेकदा मागणी करूनही कृषी विभागाकडे सादर केली नाहीत.

त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याने कंपनीच्या राज्य आणि विभागीय प्रतिनिधींच्या विरुद्ध १८ जुलै रोजी रात्री बाळापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

खरीप व रब्बी हंगामात २०२३ - २४ या काळामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे सोयाबीन, कापूस, तूर आणि मूग यांसारख्या पिकांना त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. त्यामुळे पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी या नुकसानाचा क्लेम करत पंचनामे करण्यात आले होते. तसेच या नुकसानीचे पंचनामे एचडीएफसी अग्रो या पीक विमा कंपनीकडून करण्यात आले होते.

नुकसानीचे पंचनामे, कागदपत्रे, पात्र, अपात्र यादी विमा प्रतिनिधींनी कृषी कार्यालयाकडे सादर करणे अपेक्षित होते, मात्र कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तसे न करता उलट खोट्या स्वाक्षऱ्या करून शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचा दावा केला जात आहे. फसवणूक करणाऱ्या विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात जिल्हा कृषी अधिकारी शंकर किरवे यांच्या फिर्यादीनुसार बाळापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे.

आ. देशमुख झाले होते आक्रमक

हा प्रकार उघड झाल्यानंतर शेतकऱ्यांसोबतच सामाजिक कार्यकर्त्ये व बाळापूरचे आमदार नितीन देशमुख चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. दरम्यान गुरुवारी (ता. १८) त्यांनी बाळापूर तहसीलदार वैभव फरतारे व कृषी अधिकारी दत्तात्रय काळे यांना बाळापूर नगरपरिषदेच्या दालनात डांबून ठेवले होते. संबंधित पिक विमा कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी कृषी विभागाकडे केली होती.

Crop Insurance
Drainage Water : नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात; आयुक्तांच्या दालनासमोर नागरिकांचा ठिय्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com