अकोला - मतदान केंद्राच्या कक्षाचा ताबा देण्यात दिरंगाई केल्यावरून गुरूनानक विद्यालयाच्या मुख्याध्यापिकेविरूद्ध खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोला पश्चिम मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी पी. झेड. भोसले यांनी याबाबत तक्रार दाखल केली.