नागपुरातील दिग्गज नेत्यांना पुन्हा विदर्भात गावबंदी

नागपुरातील दिग्गज नेत्यांना पुन्हा विदर्भात गावबंदी
Updated on

चिखली (जि. बुलडाणा) : विदर्भाच्या नावावर निवडणुका लढून सत्तेची फळ चाखणारे भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कोरोना काळातील विदर्भातील जनतेचे विद्युत वीजबिल तसेच २०० युनिटपर्यंत मोफत वीजबिल देऊ न शकणारे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना विदर्भात गावबंदी करण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर यांनी दिला आहे.

स्वतंत्र विदर्भ राज्य करावे या मागणीसाठी २६ ऑगस्टला शेतकरी संघटनेने चिखली येथील खामगाव चौफुल्लीवर दुपारी १२ वाजता रस्तारोको केला. शरद जोशी शेतकरी संघटनेचे आंदोलन अत्यंत शिस्तबद्ध आणि तेव्हढेच आक्रमक असल्याचा आजवरचा इतिहास पाहता आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चिखली पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता.

नागपुरातील दिग्गज नेत्यांना पुन्हा विदर्भात गावबंदी
जीवन संपविण्यापूर्वी आईचा मुलींवर प्रेमाचा वर्षांव

स्वतंत्र विदर्भ राज्य झाले तर शंभर टक्के नोकऱ्या विदर्भातील तरुणांनाच मिळेल, एमपीएससीच्या जागी व्हीपीएससी होऊन याही उच्च पदाच्या नोकऱ्या शंभर टक्के वैदर्भीय युवकांनाच मिळेल, विदर्भाच्या तिजोरीतील शंभर टक्के वाटा हा विदर्भासाठीच खर्च होईल. त्यामुळे गोसेखुर्द सारख्या धरणासह सर्व १३१ अपूर्ण धरणे ज्यामुळे १४ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल हे सर्व धरण तातडीने ५ ते १० वर्षांत पूर्ण होतील. ८० टक्क्यापर्यंत शेतीचे सिंचन वाढेल, विकास जलद गतीने होईल, विजेचे उत्पादन खर्च २.४० रुपये प्रती युनिट आहे. त्यामुळे महागडी विजेचे दर निम्म्यावरती येतील. कृषी पंपाचे लोडशेडिंग संपेल.

केंद्रात भाजपचे सरकार आहे आणि राज्यात शिवसेनेचे सरकार आहे. दोघांमधील युती तुटलेली असल्यामुळे आता विदर्भ तोडून देण्यास केंद्राला कुठलीच अडचण नाही. विदर्भ वेगळा करायला राज्य सरकारशी काहीही अडत नाही. विदर्भाचे लवकरच वेगळे राज्य निर्माण होईल असा आशावाद विदर्भावद्यांना असल्याचे त्यांनी वाटप केलेल्या पत्रकात नमूद केलेले आहे.

नागपुरातील दिग्गज नेत्यांना पुन्हा विदर्भात गावबंदी
थोबाडात हाणण्याची भाषा करणारे मुख्यमंत्र्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार

अन्यायाने कळस गाठला

आजपर्यंत विदर्भातील निधी पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी पळवून तेथे विकास घडवून आणला, तर विदर्भाच्या विकासाकडे दुर्लक्ष केले. विदर्भातील जमीन कोरडवाहू ठेवल्यामुळे विदर्भातील शेतकरी लहरी हवामानाचा नेहमीच शिकार होत आहे. परिणामी अनेकवेळा शेतीतून उत्पादन खर्च निघत नसल्याने विदर्भातील शेतकरी कर्जात बुडाला आणि आत्महत्येचा मार्ग अवलंबत आहे. विदर्भातील शेतकऱ्यांवर राज्यकर्त्यांच्या अन्यायाने कळस गाठल्याचे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.