डिवरे हत्याकांड : आमदार संजय राठोड यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांचा ठिय्या

शिवसैनिकांनी आरोपींना अटक करण्याची मागणी केली!
संजय राठोड
संजय राठोडsakal
Updated on

यवतमाळ : यवतमाळ बाजार समितीचे संचालक तथा भांबराजा गावचे माजी सरपंच सुनील डिवरे यांच्यावर गोळीबारसह कुर्‍हाडीने हल्ला चढवून त्यांचा खून केला. गुरुवार (ता.तीन) रात्री तालुक्यातील भांबराजा येथे घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली. शनिवार (ता.पाच) शिवसेना पदाधिकार्‍यांनी आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी गेल्या तीन तासापासून पोलिस अधीक्षक कार्यालयात ठिय्या मांडला आहे.

संजय राठोड
Yavatmal: कापसाचे दरही पाच हजारांवर; शेतकरी अडचणीत

अनुप्रीता सुनील डिवरे (वय 35, रा. भांबराजा) यांनी यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत शुक्रवार (ता.4) पहाटे लोहारा येथील शिवाजीनगरातून वैभव प्रभाकर सोननकर (वय 23), पवन प्रभाकर सोननकर (वय 25), रोहित भोपडे (वय 21), सुरेश पात्रीकर (वय 54 सर्व रा. भांबराजा) यांना अटक केली. आणखी तीन आरोपी फरार आहेत. या हत्येबाबत शिवसैनिकांच्या भावना अत्यंत तीव्र आहे.

संजय राठोड
Yavatmal: कापसाचे दरही पाच हजारांवर; शेतकरी अडचणीत

शनिवार (ता.पाच) विश्राम भवन येथे आमदार संजय राठोड यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत शिवसैनिकांनी आरोपींना अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिस अधीक्षक कार्यालयात धडक दिली. हे हत्याकांड अतिशय नियोजन बद्ध पद्धतीने करण्यात आले आहे. हत्याकांड केले ते फक्त मोहरे आहेत, असा आरोप शिवसैनिकांचा आहे. त्यामुळे या हत्याकांडात पद्यमागून ज्यांनी भुमिका बजावली, हे घडवून आणण्यासाठी मदत केली अशा गुन्हेगारांना पदार्फाश करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली. जिल्ह्यात सातत्याने घडणार्‍या गुन्हेगारीच्या घटनां बद्दल शिवसैनिकांनी पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ यांना जाब विचारला. यावेळी जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड, विश्‍वास नांदेकर यांचेसह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.