Dhangar community : धनगर बांधवांचे ढोल बजाव आंदोलन,एसटी प्रवर्गाचे आरक्षण लागू करा

Dhangar community : धनगर समाजाने अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्यासाठी अकोल्यात ढोल बजाव आंदोलन केले. शासनाने त्वरीत आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
Dhangar community
Dhangar communitysakal
Updated on

अकोला : धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण लागू करावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी सकल धनगर समाज बांधवांनी सोमवारी (ता. ७) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोनल केले. यावेळी ढोल व डफडे वाजवत शासनाचे ध्यानाकर्षण करण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला.

राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी धनगर बांधवांकडून सतत आंदोलन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत २३ सप्टेंबर रोजी राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

त्यानंतर सुद्धा शासनाने समाजच्या मागणीची दखल न घेतल्याने सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने सोमवारी (ता. ७) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाने त्वरीत धनगर जमातीच्या आरक्षणासंदर्भात शासन निर्णय काढावा व धनगर समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

आंदोलनात जि.प. सदस्य ज्ञानेश्वर सुलताने, माजी महापौर सुमन गावंडे, सुरेश दिवनाले, गोपाल गावंडे, संतोष कात्रे, मनोज करणकार, राजेंद्र अघडते, नितीन कोगदे, बाबाराव पातोंड, रमेश उभे, एकनाथ जरंडे यांच्यासह प्रतिष्ठित नागरिकांनी सहभाग घेतला.

या मागण्यांकडे वेधले लक्ष

धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्यात यावे, खिल्लारे कुटुंबाचे धनगड बोगस जात वैधता प्रमाणपत्र रद्द करा, अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा शासन निर्णय जारी करावा, लातूर व नेवासा फाटा येथील आंदोलनाला जाहीर पाठिंबा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.