फुलोऱ्यावरील सोयाबीनला देऊ नका युरिया; कृषी तज्ज्ञांचे आवाहन

फुलोऱ्यावरील सोयाबीनला देऊ नका युरिया; कृषी तज्ज्ञांचे आवाहन
Updated on

अकोला : काही भागात पाण्याचा ताण बसल्याने सोयाबीन पिकाची पाने पिवळी पडली होती. मात्र, काही दिवसांत पावसाने हजेरी लावल्याने पीक चांगले बहरले आहे. अशा अवस्थेत शेतकरी सोयाबीन पिकाला युरिया देतात. मात्र, त्याचा फूल धारणेवर व पर्यायाने उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे फुलोऱ्यावरील सोयाबीनला युरियाचा दुसरा हप्ता देऊ नये, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे डॉ. विनोद खडसे यांनी केले आहे.

विदर्भात बऱ्याच दिवसांनंतर सर्वत्र पावसाने हजेरी लावल्याने पिकाला मोठा आधार मिळाला आहे. सोयाबीन फुलोर अवस्थेत असताना शेतकरी सोयाबीन पिकाला युरिया देतात. परंतु, हे झाड स्वतःला लागणारे नत्र मुळावरील गाठींच्या साहाय्याने हवेतून जमा करते. युरियामुळे फुले धरणे थांबते व फांद्या फुटून शेंगांची संख्या घटते. अर्थातच खर्चात वाढ होऊन उत्पादनात घट येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी, फुलोऱ्यावरील सोयाबीनला युरियाचा दुसरा हप्ता देऊ नये, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाचे विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. विनोद खडसे यांनी केले आहे.

फुलोऱ्यावरील सोयाबीनला देऊ नका युरिया; कृषी तज्ज्ञांचे आवाहन
मुलांच्या जाण्याने आई-वडिलांनी तर पतीच्या जाण्याने बायकांनी फोडला टाहो
पिकाला अधिक फुले व शेंगा धरण्यासाठी विद्राव्य १९:१९:१९ खत २० ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून फवारावे. मोझॅक व्हायरसला कारणीभूत पांढरी माशी व तुडतुडे किडींवर नियंत्रणासाठी रामबाण उपाय म्हणजे एकरी ५ पिवळे व ३ निळे चिकट सापळ्यांना ९० टक्के किडी चिकटतात. पिकावरील खोडकिडा, चक्रीभुंगा तसेच पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी नियंत्रणासाठी इंडोस्कीकार्ब १५.८ एस सी ७ मिली किंवा इमामेक्टीन बेंझोएट १.९ ईसी ८.४ मिली किंवा क्लोरॅट्रीनिलीप्रोल १८.५ ईसी ३ मिली, यापैकी कोणतेही एक कीटकनाशक प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- डॉ. विनोद खडसे, विस्तार कृषी विद्यावेत्ता, डॉ पंदेकृवि, अकोला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()