Akola News : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून नॉन इंटरलॉकिंग ब्लॉक घेण्यात येत आहे. या कामामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार आहे. त्याबद्दर रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
गत काही दिवसांपासून रेल्वे प्रशासनामार्फत तिसरी लाईन टाकण्यासह रेल्वेची गती वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. या कामांमुळे प्रवाशांना अधिक सुविधा पुरविण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
दरम्यान नागपूर विभागातील राजनांदगाव-कळमना रेल्वे विभागादरम्यान कन्हान स्थानकावर तिसरी रेल्वे लाईन टाकण्याचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. त्यामुळे नागपूर येथून सुटणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सदर गाड्यांना अकोला रेल्वे स्टेशनवर थांबा असल्याने त्याचा फटका स्थानिक प्रवाशांना बसणार आहे.
कन्हान स्थानकावर तिसरी लाईन टाकण्याच्या कामामुळे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून नॉन इंटरलॉकिंग ब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे अकोला मार्गे धावणाऱ्या पुरी-अजमेर-पुरी एक्सप्रेसच्या प्रत्येकी ३ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यानुसार रेल्वे २०८२३ पुरी - अजमेर ट्रेन सेवा ४, ७ व ११ डिसेंबर रोजी रद्द राहील. गाडी क्रमांक २०८२४ अजमेर-पुरी गाडी ७, १२ व १४ डिसेंबर रोजी रद्द राहील.
गाडी क्र. १२८७० हावडा-सीएसएमटी मुंबई साप्ताहिक एक्सप्रेस ८ डिसेंबर रोजी रद्द राहील. गाडी क्र. १२८६९ सीएसएमटी मुंबई-हावडा साप्ताहिक एक्सप्रेस १० डिसेंबर रोजी रद्द राहील. गाडी क्र. २२९०५ ओखा-शालिमार एक्सप्रेस १० डिसेंबर रोजी रद्द राहील. गाडी क्र. २२९०६ शालिमार-ओखा एक्सप्रेस १२ डिसेंबर रोजी रद्द राहील.
गाडी क्र. १२८१२ हटिया-एलटीटी (मुंबई) एक्सप्रेस ८ आणि ९ डिसेंबर रोजी रद्द राहील. गाडी क्र. १२८११ एलटीटी (मुंबई)-हटिया एक्सप्रेस १० आणि ११ डिसेंबर रोजी रद्द राहील. गाडी क्र. १३४२५ मालदा टाउन-सुरत एक्सप्रेस २ व ९ डिसेंबर रोजी रद्द राहील.
गाडी क्र. १३४२६ सुरत-मालदा टाउन एक्सप्रेस ४ व ११ डिसेंबर रोजी रद्द राहील. गाडी क्र. १२१०१ एलटीटी (मुंबई)-शालिमार एक्सप्रेस ८, ९, ११, आणि १२ डिसेंबर रोजी रद्द राहील. गाडी क्र. १२१०२ शालीमार-एलटीटी (मुंबई) एक्सप्रेस १०, ११, १३ आणि १४ डिसेंबर रोजी रद्द राहील.
गाडी क्र. २०८२३ पुरी-अजमेर ट्रेन सेवा ४, ७ आणि ११ डिसेंबर रोजी रद्द राहील. गाडी क्र. २०८२४ अजमेर-पुरी ट्रेन ७, १२ आणि १४ रोजी रद्द राहील. गाडी क्र. २०८२२ संत्रागाची-पुणे हमसफर एक्सप्रेस ९ डिसेंबर रोजी रद्द राहील. गाडी क्र. २०८२१ पुणे - संत्रागाची हमसफर एक्सप्रेस ११ डिसेंबर रोजी रद्द राहील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.