परीक्षांची तारीख ठरली, मात्र अभ्यासाचं काय?

उजळणी करणार कधी, विद्यार्थी-पालकांत चिंता
Exam Date Set But What Study To Review Student Parent Concern
Exam Date Set But What Study To Review Student Parent Concernsakal
Updated on

शिरपूर जैन : शिक्षणमंत्र्यांनी (Education minister) दहावी आणि बारावी बोर्ड (Maharashtra State Board) परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. अवघ्या अडीच महिन्यावर परीक्षा आली असून अनेक शाळांमध्ये अद्याप संपूर्ण अभ्यासक्रम शिकवायचा बाकी आहे. एवढ्या कमी कालावधीत विद्यार्थ्यांचा (Students)अभ्यास आणि उजळणी पूर्ण होणार का? याविषयी विद्यार्थी, पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. तारीख ठरली पण अभ्यासाचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

Exam Date Set But What Study To Review Student Parent Concern
औरंगाबाद : आधी होता विषारी धूर, आता तयार होतोय गॅस

कोरोनामुळे गेली दोन वर्षे शाळा बंद होत्या, पण शिक्षण सुरू होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले असले तरी, ऑनलाईन शिक्षणातील अडचणींमुळे शैक्षणिक गुणवत्ता कमी झाली आहे. वर्गातील एकाग्रता, अभ्यासासाठी योग्य वातावरण घरी मिळू शकत नाही. बऱ्याचदा विद्यार्थी स्वेच्छेने ई-लर्निंग मध्ये सहभागी होत नव्हता, त्यामुळे ऑनलाईन वर्गात मुलांची केवळ फिजिकली उपस्थिती राहत होती. त्यामुळे ऑनलाईन-ऑफलाइन मध्ये उडालेल्या गोंधळामुळे शैक्षणिक गुणवत्तेचा गोंधळ उडाला.ऑक्टोबरपासून ऑफलाईन शाळा सुरू झाल्या, परंतु विद्यार्थ्यांच्या बौद्धिक कुवतीला धार आणण्यासाठी शिक्षकांना परिश्रम करावे लागले.

Exam Date Set But What Study To Review Student Parent Concern
अकोला : गारपिटीने झोडपले; वीज कोसळल्याने एक ठार

ऑफलाईन वर्गात विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षकांना गत वर्षीच्या उजळणीसह नवीन वर्षाचा अभ्यासक्रम असे परिश्रम घ्यावे लागले. त्यामुळे बहुतांशी शाळा व ज्युनियर कॉलेजमध्ये दहावी-बारावीच्या पाठ्यपुस्तकातील अद्याप २० ते २५ टक्के अभ्यासक्रम शिकवायचा बाकी आहे. त्यातच दोन वर्ष ११ वी पर्यंतच्या वार्षिक परीक्षा रद्द झाल्यात.

मागील वर्षी दहावी, बारावी बोर्ड परीक्षा ही रद्द झाल्याने विद्यार्थ्यांची परीक्षांना सामोरे जाण्याची मानसिकता निर्माण करण्याची गरज आहे. आता शिक्षणमंत्र्यांनी दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. बारावीची परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल तर दहावीची परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल दरम्यान होणार आहेत. मात्र अभ्यासक्रमच पूर्ण न झाल्याने उजळणी कधी करणार? प्रश्नपत्रिका सराव कधी करणार? असा सवाल उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.