Akola News : आठवड्याच्या अखेरीस अनुभवा सर्वात लहान दिवस अन् मोठी रात्र!

पृथ्वीवरील सर्वांत लहान दिवस अन् सर्वात मोठी रात्र आठवड्याच्या अखेरीस शुक्रवार, ता. २२ डिसेंबर रोजी अनुभवता येणार.
sun
sunsakal
Updated on

अकोला - पृथ्वीवरील सर्वांत लहान दिवस अन् सर्वात मोठी रात्र आठवड्याच्या अखेरीस शुक्रवार, ता. २२ डिसेंबर रोजी अनुभवता येणार आहे. रात्री मोठी असल्याने अनेक ग्रह बघण्याची संधी खगोलप्रेमींना मिळणार आहे.

पृथ्वीचा अक्ष तीच्या कक्षेच्या संदर्भात साडे तेवीस अंशांनी कललेला असल्याने दिनमान वा सूर्याचे उदयास्ताचे स्थान नेहमी बदलत असते.

ता. २१ मार्च किंवा २३ सप्टेंबर या विषुवदिनी सूर्य निश्चित पूर्वेस असतो. ता. २२ डिसेंबर या अयनदिनी सूर्य अधिकाधिक दक्षिणेकडे असून, यावेळी उत्तर गोलार्धात दिनमान कमी म्हणजे, या भागात दिवस सर्वात लहान असतो. येथून पुढे सूर्य उत्तर बाजूस सरकत जातो. यालाच उत्तरायण म्हणतात. ही स्थिती २१ जून या दिवशी पूर्ण होते.

हा दिवस आपल्या भागात सर्वात मोठा असतो. ता.२२ डिसेंबर रोजी सूर्य नेमका पृथ्वीच्या मकर वृत्तावर असून, अक्षवृत्तीय स्थितीनुसार जेवढे उत्तर बाजूस जाल तेवढे दिनमान वाढत जाते आणि उत्तर ध्रुवावर ते सर्वाधिक असते.

दिवस-रात्रीबाबतचे काही प्रमुख तथ्य

- २१मार्च व २३ सप्टेंबर या संपातदिनी दिवस रात्र समान

- सव्वा तेरा तासांची रात्र

- पावणे अकरा तासांचा दिवस

- २२ डिसेंबर या अयनदिनी सर्वात लहान दिवस

अकोल्यात पावणे अकरा तासांचा दिवस

अकोला येथील सूर्योदय सकाळी ६.५६ या वेळी तर सूर्यास्त ५.४४ वाजता असेल. या भागात सुमारे पावणे अकरा तासाचा दिवस तर सव्वा तेरा तासांची रात्र राहील. याच दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होऊन दिनमान वाढत जाते. यातील फरक मात्र मकर संक्रांतीला जाणवतो, म्हणूनच तीळसंक्रांतीपासून दिवस तीळा- तीळा प्रमाणे वाढते, ही प्रथा जनमानसात रुढ झाली असावी.

गुरु, शूक्र, शनी दर्शनाची पर्वणी

ता. २२ डिसेंबर या दिवशीची रात्र सर्वात मोठी असल्याने ग्रह ताऱ्यांचे दर्शनाची उत्तम संधी असेल. रात्रीच्या प्रारंभी पूर्वेकडे वर चंद्र आणि सर्वात मोठा गुरु ग्रह एकमेकांच्या जवळ, आणि याच वेळी दक्षिण आकाशात वरच्या बाजूला शनी ग्रह आणि पहाटे पूर्वेला शूक्र ग्रहाचे ठळक स्वरूपात दर्शन घेऊन आपले आकाश प्रेम वृध्दिंगत करण्याचे आवाहन विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.