अकोला, ः गेले आठ दिवसांपासून बँकांचे (Bank) व्यवहार नागरिकांसाठी बंद होते. सोमवारपासून व्यवहार पुन्हा सुरू झालेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी अकोला शहरासह जिल्हाभरातील बँकांमध्ये नागरिकांनी एकच गर्दी केली होती. अकोट, मूर्तिजापूर, तेल्हारा, बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी आदी ठिकाणासह ग्रामीण भागातील बँकांमध्येही नागरिकांनी एकच गर्दी केल्याचे बघावयास मिळाली. बँकांमध्ये उसळेल्या गर्दीत कोविड नियमांचे उल्लंघन होताना दिसले. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्गाची साखळी कशी ब्रेक होणार, असा प्रश्न पडला आहे. Farmers' lives in danger for PM Kisan Yojana's Rs 2,000! Crowds erupted in the banks
मूर्तिजापुरात बँकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
मूर्तिजापूर : सोमवारी बँका उघडल्या अन् सोशल डिस्टंसिंगचा पार फज्जा उडाला. आठ दिवसानंतर उघडलेल्या बँकांमध्ये ग्राहकांनी एकच गर्दी केली. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सोशल डिस्टंसिंग या प्रभावी आयुधाला निष्प्रभ ठरविण्याचा प्रकार आज सर्व बँकांसमोर प्रत्ययास आला. कडक लॉकडाउनमुळे जीवनावश्यक वस्तूसह बँकांवरील निर्बंध सर्व आर्थिक व्यवहार ठप्प करणारे ठारले. सात दिवसांनी लॉकडाउन शिथील झाला वा आठ दिवसांनी निर्बंधात सूट मिळाल्याने व मागील आठ दिवसापासून ग्रामीण व शहर भागातील लोकांजवळ पैशाची निर्माण झालेली चणचण त्यांना बँकांमध्ये घेऊन गेली. पैसे काढण्याकरिता बँक उघडण्यापूर्वीच लोकांनी पत संस्था, खाजगी बँक, शासकीय बँकासमोर उभे राहून बँक उघडण्याची वाट पाहत रांगा लावल्या. बँका उघडताच बँक व्यवहार फक्त १ वाजेपर्यंतच असल्याने एकच झुंबड उडाली. बँकेत एकदम प्रवेश करण्याकरिता गर्दी करताना शासनाच्या सोशल डिस्टन्स, मास्क या नियमाचा ग्राहकांना पार विसर पडला. एकच गर्दी झाल्याने बँक कर्मचाऱ्यांचीही तारांबळ उडाली.
अकोट शहरातील बँकेत सोशल डिस्टनसिंगला खो
अकोट : जिल्ह्यात सात दिवसांच्या कडक लॉक डाऊन नंतर आज कामकाजाच्या पहिल्याच दिवशी अकोट शहरात सर्वच बँक, पतसंस्थे बाहेर खातेदारांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. यावेळी कलदार चौकातील अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य द्वाराजवळ मोठ्या प्रमाणात खातेदारानी गर्दी केल्यामुळे सोशल डिस्टनसिंग चे तीनतेरा वाजले.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या नवीन हप्त्याची रक्कम रुपये २००० खात्यात जमा झाल्याने हा निधी काढण्यासाठी,तसेच कर्ज नूतनीकरण करण्यासाठी आज शहरातील सर्वच बँक बाहेर नागरिकांनी गर्दी केली होती. राज्यात सह जिल्ह्यात कोरोनाचे संकट घोंगावत असताना बाहेर अशी गर्दी करणे सर्वांच्याच धोक्याचे आहे. संसर्ग वाढू नये म्हणून राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. सोशल डिस्टनसिंग पाळण्यासाठी प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. तरीही आज अकोट शहरातील अनेक ठिकाणी याचं पालन होताना दिसत नाही. अकोट शहरात बँके बाहेर रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांनी सोशल डिस्टंसिंग बाबत कोणतीही दक्षता घेतली नव्हती परिणामी नागरिकांच्या या बेजबाबदार पणाचा इतरांना आरोग्यदृष्ट्या त्रास होण्याची भीती निर्माण झाली आहे.
नियमांची पायमल्ली करून ग्राहकांची गर्दी जमविणारे बँकेचे धोरणही या प्रकारासाठी कारणीभूत असून, ग्राहकांच्या सोयीसाठी तथा गर्दी घालविण्यासाठी दोन पेक्षा अधिक काउंटर सुरू करून आर्थिक देवाणघेवाण केल्यास एवढी गर्दी जमा झाली नसती अशा प्रतिक्रिया खातेदारांनी आमच्या प्रतिनिधीनां दिल्यात.
संपादन - विवेक मेतकर
Farmers' lives in danger for PM Kisan Yojana's Rs 2,000! Crowds erupted in the banks
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.