Akola News : पुलाअभावी शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास; महागाव येथील महासमस्या, संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष

गोहोगाव येथील नागरिकांचे पोस्ट महागाव असल्याने संबंधित कामांची सुद्धा पंचाईत
farmers travel deadly travel to live life due to bridge mahagaon administration akola
farmers travel deadly travel to live life due to bridge mahagaon administration akolaSakal
Updated on

- वसंत खडसे

रिसोड : तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेले महागाव हे जिल्ह्यातील सर्वात मोठी नदी असलेल्या पैनगंगा नदीच्या तीरावर वसलेले गाव आहे. याच नदीवर बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याचे पाणी अडविल्यानंतर पैलतीरावर असलेल्या शेतात जाण्यासाठी येथील शेतकऱ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे किंवा १५ कि.मी. चा फेरा पूर्ण करून शेतात जावे लागत आहे.

शिवाय गोहोगाव येथील नागरिकांचे पोस्ट महागाव असल्याने संबंधित कामांची सुद्धा पंचाईत झाली आहे. त्यामुळे शेतकरी संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याप्रती रोष व्यक्त करीत आहेत.

महागावच्या स्मशानभूमीजवळून जाणारा सदर रस्ता गोहगाव ( हाडे ) या गावाला जोडणारा पूर्ववहिवाटचा रस्ता आहे. गोहोगाव या गावाचे पोस्ट कार्यालय महागाव असल्याने सर्वात जवळचा व सोयीस्कर म्हणून दोन गावांना जोडणारा प्रचलित रस्ता आहे.

तद्वतच महागाव येथील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पैनगंगा नदीच्या पैलतीरावर असून सबंधित शेतकऱ्यांचा हा मुख्य शेतरस्ता आहे. मात्र नजीकच्या बाळखेड येथे पैनगंगा नदीवर बांधलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यामुळे सदर रस्ता भूतकाळात जमा होण्याच्या मार्गावर आहे.

या गंभीर बाबीकडे संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कानाडोळा करत असल्याने दैनंदिन कामासाठी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना घरगुती शक्कल लढवून धोकादायक साधनांचा उपयोग करून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. घरगुती वापरातील पाण्याच्या टाक्या हवाबंद करून त्यावर खाट बांधून तयार झालेल्या साधनाचा पैलतीरी जाण्यासाठी होडी म्हणुन उपयोग करण्यात येत आहे.

या बाबत काही शेतकऱ्यांना विचारणा केली असता, " हाकेच्या अंतरावर असलेल्या शेतात जाण्यासाठी महागाव ते वाकद ५ कि.मी वाकद ते गोहोगाव ५ कि.मी. आणि परत गोहगाव ते शेत ५ कि.मी असा पंधरा किलोमीटरचा फेरा पूर्ण करून शेतात जावे लागत असल्याची धक्कादायक माहिती संबंधित शेतकऱ्यांकडून मिळाली आहे."

परिणामी नाहकचा त्रास सहन करून शेतकऱ्यांचा वेळ देखील वाया जात असल्याने सदर शेतकरी हा जीवघेणा प्रवास करत असल्याचे वास्तव समोर आले आहे. घरगुती होडीतून धोकादायक प्रवास करताना तुडुंब भरलेल्या नदीपात्रात अपघात होऊ शकतो.

farmers travel deadly travel to live life due to bridge mahagaon administration akola
Akola Crime : नॅचरोपॅथीचा डॉक्टर करीत होता ॲलोपॅथीची प्रॅक्टिस; डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

महागावच्या शेतकऱ्यांची ही महा समस्या आजची नसून गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. या गंभीर समस्येकडे सबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष तर होतच आहे, पण जिल्ह्यातील आजी, माजी आमदार, खासदार व इतर स्थानिक लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत असल्याचे महागाव येथील संतप्त नागरिक म्हणत आहेत.

या बाबत कोणीतरी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांचा हा जीवघेणा प्रवास थांबवावा, अशी अपेक्षा त्रस्त शेतकऱ्यांनी "सकाळ"शी बोलताना व्यक्त केली आहे.

farmers travel deadly travel to live life due to bridge mahagaon administration akola
Pune Crime : पार्ट टाइम जॉबच्या आमिषाने संगणक अभियंत्याची फसवणूक

नदीच्या पलीकडच्या काठावर माझे शेत असून, शेतात जाणाऱ्या रस्त्याची समस्या आमच्या पूर्वजांपासून आजपर्यंत कायम आहे. शेतात जाण्यासाठी पुल नसल्यामुळे जवळपास २० वर्षांपूर्वी शेतातून घरी परत येताना माझे काका हिम्मतराव हुंबाड हे पुरात वाहून मृत्युमुखी पडले. याचा संपूर्ण गाव साक्षीदार आहे. पुन्हा अशी दुर्दैवी घटना घडू द्यायची नसेल तर आमच्या शेतरस्त्यावर तत्काळ पुल बांधणे खुप गरजेचे आहे.

- माधव साहेबराव हुंबाड, शेतकरी, महागाव ता.रिसोड

मी, नुकतीच काही महिन्यांपुर्वी लोकनियुक्त सरपंचपदावर रुजू झाली आहे. ग्रामपंचायतचे पूर्वीचे कामकाज पाहता, शेतात जाणाऱ्या जवळपास सर्वच पांदण रस्त्यांचे काम झालेले नाही. महागाव ते गौंढाळा या एकमेव शेतरस्त्याचे काम केले असून,

महागाव ते करंजी शेतारस्त्याचे काम देखील होणे बाकी आहे. मी ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या उपयुक्त कामांचा आराखडा प्रशासनाकडे प्रस्तावित केला आहे. त्याचा पाठपुरावा देखील सुरू आहे. त्याचप्रमाणे गोहोगावकडे जाणाऱ्या शेतरस्त्यावर पुल बांधण्यासाठी सुद्धा पोटतिडकीने पाठपुरावा करणार आहे.

- रुपाली संतोष मवाळ, सरपंच, महागाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()