Akola News : सनासुदीला भेसळीचा ‘जोर’; अप्रमाणीत आढळले १७ नमुने

सनासुदीला अन्न व खाद्यपदार्थात भेसळीचा जोर वाढला आहे.
adulterated sweets
adulterated sweetssakal
Updated on

अकोला - सनासुदीला अन्न व खाद्यपदार्थात भेसळीचा जोर वाढला आहे. अन्न व औषध प्रशासनाने गेले सहा महिन्यात केलेल्या कारवाईत १७ नमुने अप्रमाणीत आढळून आले असून, भेस करणाऱ्या व्यावसायिकांकडून चार लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

गत सहा महिन्यांच्या काळात नियमपालन न करणाऱ्या विविध दुकाने, हॉटेल, उपाहारगृहांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. अन्न विक्रेत्यांकडील १७ अन्न नमुने अप्रमाणित आढळल्यावरून तीन लाख १४ हजार व नियमपालन न करणाऱ्या २० दुकानांकडून एक लाख तीन हजार ५०० रु. दंड वसूल करण्यात आला.

जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली अन्न सुरक्षा अधिनियम जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली. त्यात अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त शरद तेरकर यांनी ही माहिती सादर केली.

एप्रिल ते सप्टेंबर २०२३ या कालावधित करण्यात आलेल्या कामकाजाचा आढावा श्री. तेरकर यांनी सादर केला. या कालावधित अकोला जिल्ह्यात एकूण ९९ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. त्यापैकी १७ नमूने अप्रमाणित आढळून आले. याशिवाय १६२ अन्न आस्थापनांच्या तपासण्या करण्यात आल्यात. त्यात नियम न पाळणाऱ्या २० आस्थापनांकडून एकूण एक लाख तीन हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

दूध भेसळ रोखण्यासाठी होणार तपासणी

अकोला शहरातील व जिल्ह्यातील हॉटेल, उपाहारगृहांच्या जास्तीत जास्त तपासण्या करून उल्लंघन करणाऱ्या पेढ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. दुधातील भेसळ रोखण्याच्या दृष्टीने अकोला शहरातील व जिल्ह्यातील किरकोळ दूध विक्रेते, दूध संकलन केंद्र यांच्या तपासण्या करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.

प्रतिबंधिक गुटख्यावर कारवाईचे निर्देश

शासनाने राज्यात प्रतिबंधित केलेले गुटखा, पान मसाला, सुगंधीत तंबाखू जिल्ह्यात सर्रास विकल्या जातो. या पदार्थांची साठवणूक, वाहतूक व विक्रीवर प्रतिबंध करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने जास्तीत जास्त कारवाई करण्याची सूचनाही जिल्हाधिकारी यांनी अधिकाऱ्यांना केली आहे.

या सूचनांचे पालन बंधनकारक

- सर्व अन्न व्यावसायिकांना व्यवसाय परवाना बंनकारक

- नोंदणी प्रमाणपत्र घेणे आवश्यक

- प्रमाणपत्र दुकानात दर्शनी भागात लावलेच पाहिजे

- हॉटेल व अन्न पदार्थांच्या प्रतिष्ठानांमध्ये स्वच्छता ठेवणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()