RTE Admission : आरटीई प्रवेशासाठी पाच दिवस मुदतवाढ; कागदपत्रे मिळविण्यात अडचणी

RTE Admission News : राज्यातील प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा खूप कमी असल्याचे निर्दशनास आल्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालयाने ५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
five days extension for RTE admissions till 5th august  Difficulties obtaining documents education
five days extension for RTE admissions till 5th august Difficulties obtaining documents education sakal
Updated on

अकोला : जिल्ह्यातील १९७ खासगी स्वयं अर्थसाहाय्यित शाळांमध्ये एक हजार ९१८ विद्यार्थ्यांना पहिलीसाठी मोफत प्रवेश मिळणार आहे. प्रवेशासाठी ३१ जुलैची शेवटची तारीख होती. मात्र, यंदा प्रवेशप्रक्रिया कासवगतीने सुरू असल्याने अर्जांची पडताळणीच होत नसल्याचे चित्र आहे. राज्यातील प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा खूप कमी असल्याचे निर्दशनास आल्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालयाने ५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

आरटीईतून प्रवेशासाठी मेसेज आलेल्या पालकांकडून प्रवेश निश्चित करण्यासाठी तालुका स्तरावर अर्जांची पडताळणी केली जात आहे. यंदा आरटीईचे प्रवेशांना कमालिचा उशिर झाला आहे. शालेय शिक्षण विभागाने पूर्वीच्या ‘आरटीई’च्या प्रवेश नियमांमध्ये बदल करून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, खासगी अनुदानित शाळांचा पर्याय दिला होता.

या निर्णयानुसार ज्या विद्यार्थ्यांच्या राहत्या घरापासून एक किमी अंतरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या किंवा खासगी अनुदानित शाळा नाही, त्यांनाच इंग्रजी माध्यमाच्या स्वयंअर्थसाहाय्यित शाळांमध्ये प्रवेश घेता येणार होता. पण, या बदलाला काहींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आणि त्याठिकाणी अंतरिम स्थगिती मिळाल्यावर शालेय शिक्षण विभागाने तो बदल तात्पुरता थांबवून पालकांकडून दुसऱ्यांदा अर्ज भरून घेतले.

five days extension for RTE admissions till 5th august  Difficulties obtaining documents education
RTE Admission 2024 : परभणी जिल्ह्यात जुलैअखेर ‘आरटीई’त फक्त २०५ प्रवेश निश्चित; पालकांच्या तक्रारीही वाढल्या

त्यानंतर ७ जुलैला प्रवेशाची सोडत तथा लॉटरीदेखील निघाली, मात्र न्यायालयाच्या अंतिम निर्णयामुळे प्रवेशप्रक्रिया पुढे सरकली नव्हती. उच्च न्यायालयाने तो बदल रद्द ठरविल्याने विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्ह्यात आरटीई पात्र १९७ खासगी शाळा आहेत. त्यामध्ये २५ टक्के मोफत प्रवेशाच्या २०१४ जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी सुमारे चार हजार ८८९ पालकांनी अर्ज केले होते. त्यापैकी एक हजार ९१८ विद्यार्थ्यांना आरटीईतून इयत्ता पहिलीला प्रवेश मिळणार आहे.

मात्र, पडताळणीची प्रक्रिया कासवगतीने सुरू असल्याने पालकांचे टेन्शन वाढले आहे. आता पाच दिवस मुदतवाढ मिळाल्यानंतर काहीसा दिलासा पालकांना मिळाला आहे. येत्या ५ ऑगस्टपर्यंत आपल्या पाल्याचा प्रवेश आरटीईतून निश्चित करण्यासाठी पालकांची धावपळ असणार आहे.

five days extension for RTE admissions till 5th august  Difficulties obtaining documents education
RTE Admission : ‘आरटीई’तून ८०१ प्रवेश निश्चित; प्रवेशासाठी उरले शेवटचे दोन दिवस

कागदपत्रांमुळे अनेक अडचणी

आरटीई प्रवेशासाठी तालुकास्तरील समितीमार्फत अर्ज पडताळणी करावा लागतो. त्यानंतर पात्र विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित होतो. प्रवेशासाठी विद्यार्थ्याचा जन्माचा दाखला आवश्यक आहे. मात्र, गत सात दिवसांपासून जन्म-मृत्यूचे दाखले मिळत नसल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत. सर्व्हर डाउन असल्यामुळे प्रमाणपत्रे मिळत नसून याचा फटका आरटीई प्रवेशाला बसत आहे.

पोर्टलवरून खात्री करावी

प्रवेशपात्र काही पालकांना मेसेज प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे पालकांनी केवळ मोबाइलवरील एसएमएसवर अवलंबून न राहता अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली की नाही याची खात्री पोर्टलवरून करावी. https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर जाऊन लॉटरीतून नंबर लागलेल्यांची यादी पाहता येणार आहे. प्रवेशासाठी मेसेज आलेल्या पालकांनी ५ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील तालुकास्तरावर पडताळणी करून बालकांचा प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले.

प्रवेश प्रक्रिया दृष्टीक्षेपात

  • आरटीईच्या शाळा - १९७

  • एकूण जागा - २०१४

  • प्रवेश पात्र विद्यार्थी - १९१८

  • प्रवेश निश्चित झालेले विद्यार्थी - ९०८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.