Akola News : येत्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये २६ एप्रिल रोजी मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ईपीक म्हणजेच मतदार फोटो ओळखपत्र आणि इतर १२ ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. यापैकी कोणताही एक ओळखीचा पुरावा मतदार केंद्रावरील अधिकाऱ्यांना दाखवल्यानंतर मतदारांना मतदान करता येणार आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता छायाचित्रांसह मतदार ओळखपत्र म्हणजेच ईपीक देण्यात आले आहे ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटवण्यासाठी छायाचित्रांसह मतदार ओळखपत्र सादर करतील.
परंतू मतदारांकडे छायाचित्रांसह मतदार ओळखपत्र नसल्यास अशा मतदारांना त्यांची ओळख पटवण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त इतर १२ पुराव्या पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहेत.
मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी स्वत:ची ओळख पटवण्यासाठी पुराव्यांमध्ये आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक किंवा पोस्ट ऑफिसने जारी केलेले छायाचित्र असलेले पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना,
पॅन कार्ड, रजिस्टार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रांसह पेन्शन दस्तऐवज, केंद्र, राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपनी यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदार,
आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र असे १२ कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत.
त्यामुळे मतदान करायला जाताना मतदान केंद्रावर नागरिकांनी आपल्याकडील जे पुरावे असतील ते सोबत न्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.