Akola : अर्बन निधी बँकेकडून फसवणूक; ग्राहकांची पोलिसात तक्रार; मानोरा तालुक्यात खळबळ

Manora latest news in marathi | ही कालावधीनंतर हे ग्राहक पैसे काढण्यासाठी बँकेत गेले असता उद्या या, परवा या असे सांगितले जात असून बँकेकडून रक्कम देण्यास टाळटाळ केली जात आहे.
Fraud by Urban Nidhi Bank Consumer complaints to police Manora taluka akola
Fraud by Urban Nidhi Bank Consumer complaints to police Manora taluka akolaSakal
Updated on

मानोरा : तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या मानोरा अर्बन निधी लिमिटेड बँकेकडून लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार बँकेच्या तब्बल नऊ ग्राहकांनी पोलिस ठाण्यात १७ जुलै रोजी दिली आहे. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मानोरा येथील निधी बँकेचे ग्राहक लोमेश रामहरी राऊत, डॉ.एन. पी. नांदे, मयुर संजय तंवर, शुभम अशोक जंगम, रामकृष्ण सावळे, दर्शन चक्रवार, राहुल लोंढे आदींनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, हे ग्राहक या निधी अर्बन बँक शाखेत खाते काढून त्या खाते ठेव पुस्तकात दैनंदिन पैसे भरत होते.

ही रक्कम त्यांनी बचत ठेव योजनेसाठी दिली होती. काही कालावधीनंतर हे ग्राहक पैसे काढण्यासाठी बँकेत गेले असता उद्या या, परवा या असे सांगितले जात असून बँकेकडून रक्कम देण्यास टाळटाळ केली जात आहे.

सदर ग्राहकाच्या खात्यात किती पैसे शिल्लक आहेत, हे पाहण्यासाठी खाते पुस्तक मागितले असता ते दिले जात नाही. यावरून या ग्राहकांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. बँकेचे शाखा व्यवस्थापक योगेश रवींद्र राठोड आणि संचालक यांचेकडे हे ग्राहक गेले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, असा आरोप या ग्राहकांनी आपल्या तक्रारीत केला आहे.

राजकीय दबाव टाकून आणि भविष्यात आपणास कर्ज देतो असे सांगून आम्हाला गप्प बसण्यास सांगितले. तसेच शिविगाळ करून खोटा गुन्हा दाखल करून फसविण्याची धमकी दिली. आम्ही आमच्या घामाचे पैसे या बँकेत ठेवले होते, या प्रकरणी योग्य चौकशी करून आम्हाला न्याय देण्याची मागणी पोलिस स्टेशनला केली आहे.

- बँकेचे ग्राहक

मानोरा अर्बन निधी बँकेसंदर्भात १७ जुलै रोजी तक्रार प्राप्त झाली आहे. कागदपत्रे पाहून तक्रारदार यांनी केलेले आरोप योग्यप्रमाणे तपासल्या जातील. चौकशी करून प्रकरणात सत्यता असेल तर कारवाई करण्यात येईल.

- प्रवीण शिंदे, पोलिस निरीक्षक, पोलिस स्टेशन मानोरा.

ज्या ग्राहकांनी पोलिसात तक्रार केली आहे, त्यापैकी एकाने बँकेत येऊन कर्ज का देत नाही, म्हणून हुज्जत घातली होती. त्यांनी काही ग्राहकांना एकत्र करून फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे, मात्र आम्ही त्यांचे पैसे देण्यास तयार आहोत.

-योगेश राठोड, शाखा व्यवस्थापक, मानोरा अर्बन निधी लिमिटेड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.