Credit Card व्दारे Online गाडी बुकिंग करत असाल तर थांबा, अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान!

फसवणूक झालेल्या वेगवेगळ्या रक्कमाचे व्यवहार गोठवण्यात आले.
Credit Card Online Car Booking
Credit Card Online Car Bookingesakal
Updated on
Summary

तक्रादार यांची ऑनलाइन फसवणूक झालेली रक्कम चार लाख रुपये परत तक्रारदारास मिळवून देण्यात सायबर पोलिसांना यश आले.

अकोला : गाडी भाड्याने बुक करण्याकरिता क्रेडिट कार्डने (Credit Card) रकमेचा भरणा केला आणि बघत-बघता क्रेडिट कार्डवरून खातेदाराच्या नावावर चार लाख २५ हजार रुपयांची रक्कम काढण्यात आली. फसवणुकीचा हा प्रकार अकोला सायबर पोलिसांनी (Akola Cyber Police) शोधून काढत क्रेडिट कार्डधारकाला रक्कम परत मिळवून दिली.

तक्रारदार राजेंद्र रहाणे (रा. खामगाव ह. मु. बोरगाव मंजू) यांना भाड्याने गाडी हवी असल्याने त्यांनी ऑनलाइन बुकिंग केली. त्यासाठी त्यांनी एक ऑफर पाहिली आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमाने पेमेंट केले. २५ टक्केपर्यंत सूट मिळणार असल्याची ऑफर बघून दिलेल्या लिंकवर जावून गाडी बुक करण्याकरिता क्रेडिट कार्डचा वापर केला.

Credit Card Online Car Booking
Kolhapur : 'मराठ्यांशी दुश्मनी करणाऱ्या त्या अधिकाऱ्याच्या छाताडावर नाचू'; मराठा संघटना-जिल्हाधिकाऱ्यांत जोरदार खडाजंगी

पेमेंट भरल्यानंतर अज्ञात मोबाईल क्रमांकावरून फोन आला असता तक्रारदार यांनी गाडी बुकिंग संबंधित माहिती संबंधिताला दिली. त्यानंतर तक्रारदार यांनी क्रेडिट कार्डची सर्व माहिती व ओटीपी नंबर सांगितला. त्याच क्षणी तक्रारदार यांचे क्रेडिट कार्डमधून चार लाख २५ हजार रुपयांची कपात झाल्याचा मॅसेज आला. तक्रारदार यांना आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे व बघितलेली जाहिरात फसवी असल्याचे निदर्शनास आले.

झालेल्या ऑनलाइन फसवणुकीबाबत त्यांनी एनसीसीआरपी पोर्टलवर ऑनलाईन तक्रार दिली. त्या अनुषंगाने सायबर पोलिस स्टेशन, अकोला यांच्याकडे सदर तक्रार प्राप्त झाली. सायबर पोलिसांनी तक्रारदाराने केलेल्या ऑनलाइन व्यवहाराबाबत तत्काळ माहिती घेवून संबंधित कंपनी बरोबर पत्रव्यवहार केला. फसवणूक झालेल्या वेगवेगळ्या रक्कमाचे व्यवहार गोठवण्यात आले.

Credit Card Online Car Booking
Rohit Pawar : शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं हे मुख्यमंत्र्यांनी अजितदादांना विचारावं; रोहित पवारांचा टोला

तक्रादार यांची ऑनलाइन फसवणूक झालेली रक्कम चार लाख रुपये परत तक्रारदारास मिळवून देण्यात सायबर पोलिसांना यश आले. सलग दुसऱ्या तक्रारीत अकोला सायबर पोलिसांनी फसवणुकीतील रक्कम परत मिळवून देण्यात यश मिळविले. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनात सायबर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विजय नाफडे, पोलिस अंमलदार गजानन केदारे, अतुल अजने यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()