e-Pos Machine : 'इ-पॉस मशीन'ची संग्रामपुरात प्रेत यात्रा?

स्वस्त धान्य दुकानची 'इ-पॉस मशीन' नेटवर्क च्या कचाट्यात.
ePos Machine Funeral in sangrampur
ePos Machine Funeral in sangrampursakal
Updated on

संग्रामपूर (बुलढाणा) - राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी स्वस्त धान्य दुकानदार यांना नवीन फोरजी 'इ-पॉस मशीन' दिल्या आहेत. मात्र त्या मशीनमध्ये नेटवर्कची समस्या आल्याने संग्रामपूर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानंदार त्रस्त झाले असता त्यांनी त्या मशीनची तिरडी काढून मशीन संग्रामपूर तहसीलदारकडे दि. 5 ऑगस्ट रोजी जमा केल्या.

दिलेल्या निवेदनानुसार, स्वस्त धान्य दुकानदार यांना ज्या 'इ-पॉस मशीन' दिल्या त्या मशीनमध्ये नेटवर्कची समस्या मागील 27 जुलै पासून आली आहे. आमचे धान्य दुकानदार सकाळी 8 वाजता पासून ती मशीन दुकानमध्ये घेऊन बसतात. मात्र ती मशीन नेटवर्क मूळे चालत नाही.

सध्या गावा-गावात स्वस्त धान्य दुकानमार्फत इ-केवायसी करने सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांना आम्ही आमच्या दुकानात केवायसी करण्यासाठी बोलावतो. परंतु मशीनच चालत नसल्याने केवायसीची प्रक्रिया पूर्ण होत नाही. आणि सरकारद्वारे चालविण्यात येणारे मोफत धान्य ही वाटप होत नाही., यामुळे ग्राहक आणि धान्य दुकानदारमध्ये वाद निर्माण होत आहेत.

ग्राहक हा धान्य दुकानदार याना जबरदस्तीने धान्य मागतो., आम्ही नेटवर्कचे खरे कारण सांगितले तर ते म्हणतात त्याच्याशी आम्हाला काही घेणे देणे नाही., आम्हाला माल द्या. रोज-रोज होणाऱ्या या समस्यामुळे मानसिक ताण वाढला आहे. अन्न पुरवठा विभागकडून सुरळीत चालणाऱ्या मशीन देण्यात याव्या, अन्यथ ऑफलाइन पद्धतीने वाटप करण्याची परवानगी द्यावी.

असे निवेदन स्वस्त धान्य दुकानदार संघटना संग्रामपूर तालुका कडून तहसीलदार यांना देण्यात आले आहे. दिलेल्या मशीनची तिरडी काढून त्या तहसीलदार यांच्याकडे जमा करण्यात आल्या. या निवेदनच्या प्रति जिल्हाधिकारी बुलढाणा, जिल्हा पुरवठा अधिकारी बुलढाणा यांना देण्यात आल्या.

यावेळी तालुका अध्यक्ष केशव दाणे, अशोक नांदोकार, सुरेश नाकट, अनिल सातपुते, प्रवीण वाघ, अनुप अवचार, गणेश झाडोकार, सुनील मेहंगे, शिवहरी खोंड, याच्यासह तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानंदार उपस्थित होते.

मागील 4 माहिण्यापुर्वी राज्य सरकारने अन्न व पुरवठा विभागमार्फत '4 जी'च्या इ पॉस मशीन स्वस्त धान्य दुकानदार याना देण्यात आल्या होत्या. राज्य सरकारने ग्राहक यांचे केवायसी करण्याचे आदेश दिले आहेत. मागील 27 जुलै पासुन या मशीन नेटवर्क प्रॉब्लेममुळे काम करत नाही. यामुळे केवायसी आणि धान्य वाटप होत नाही.

ग्राहक आणि दुकानंदार यांच्यात वाद होत आहेत. म्हणून मी तालुका अध्यक्ष या नात्याने तालुक्यातील सर्व इ पॉस मशीन तहसीलदार यांच्याकडे जमा केल्या आणि ऑफलाइन वाटप करण्याचे आदेश द्यावे या करता निवेदन दिले.

- केशव दाणे, तालुका अध्यक्ष स्वस्त धान्य दुकान संघटना, संग्रामपूर तालुका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.